चारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीतील मामुर्डी या गावामध्ये मयुर गोविंद गायकवाड याचे डोक्यामध्ये व गळ्यावर फावड्याने वार करुन त्याचा खून करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन घटनास्थळी पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी भेट दिली होती.

गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, संदिप ठाकरे, ज्ञानेश्वर गाडेकर, स्वामिनाथ जाधव यांचे तपास पथकाने मयुर ची पत्नी रुतु मयुर गायकवाड (20, रा. भैरोबामंदिराचे मागे, मामुर्डी, देहुरोड) हिला विश्वासामध्ये घेवुन सखोल तपास केला.

त्यावेळी तीने तीला तीच्या नवऱ्याकडुन नेहमीच लैंगिक छळ होत होता. सदर त्रासाबाबत तीने अनेकदा तीचा नवरा, तीची सासु, साररचे नातेवाईक तसेच आई वडील यांना सांगुनही तीची सुटका होत नव्हती. सदर त्रासातुन सुटण्याकरीता पतीला संपवणे हाच एक मार्ग तिला वाटत होता. त्यावरुन तिने 04 दिवसांपासुन प्लॅन करुन तीचे शेजारी राहणारी एक महिला व काही लहान मुले यांचेसह मॉर्निंग वॉकला जाणे सुरू केले. ती नवरा एकटा घरी असण्याची वाट पाहु लागली.

दि 28/09/2020 रोजी संध्याकाळी तीच्या सासुला रात्रपाळी डयुटी करीता जावे लागले. तसेच तीचा दिर हा घरी येणार नव्हता याची माहिती होती, तसेच तीचा पती मयुर याने रात्री उशीरा 11.00 वाजणेचे सुमारास दारु पिवुन जेवण केले तो पुर्ण नशेमध्ये होता. याच संधीची ती वाट पहात होती. तीने रात्रभर नवरा झोपला असताना त्याला संपविण्याबाबत अनेकदा विचार केला. शेवटी तीने सकाळी नेहमीप्रमाणे शेजारीण व लहान मुले यांचे बरोबर मॉर्निंग वॉकला जावुन मॉर्निंग वॉक वरुन परत आली.

पती मयुर गोविंद गायकवाड हा झोपेमध्ये असताना घरातील फावडे त्याचे डोक्यामध्ये घालुन त्यास त्याचे हाताला धरुन सरळ करुन फावडयाचे पुढील बाजुने गळयावर वार करुन त्याची हत्या केली. पतीला मारताना तीच्या जिन्स पॅन्टवर उडालेले रक्त तिने पाण्याणे साफ करुन पुन्हा त्याच लहान मुलांना सोबत घेवुन सायकलींग करण्याकरीता जावुन पुन्हा घरी येवुन आपण घरी नसताना अज्ञात व्यक्तींनी पतीची हत्या केल्याचा बनाव केला. मोठयाने आरडोओरडा करुन शेजारीपाजारी गोळा झाले असल्याचे पाहुन बेशुध्द पडल्याचा बहाणा केला. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर तीने तीच्या पतीचा खुन कोणीतरी चोरीचे उद्देशाने केला असल्याचे सांगुन दिशाभुल केली.