Pimpri : ‘बाबा मला वाटले तुम्ही गेले वर असे म्हणून 80 वर्षाच्या वृद्धाला मारहाण; महाळुंगे -पाडाळे ग्रामपंचायतीसमोर घडली धक्कादायक घटना

पिंपरी : बराच दिवसांनी आठवडे बाजारात भेटलेल्या तोंडओळखीच्या तरुणाने ‘बाबा मला वाटले तुम्ही गेले वर’ असे म्हणून त्यांच्याकडील आधाराच्या काठीने ८० वर्षाच्या वृद्धाला मारहाण करुन जखमी केले.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी मुनिराज प्रभाकर पाडाळे (वय ३५, रा. ग्रामपंचायतीसमोर, महाळुंगे पाडाळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी नाथा किसन ससाणे (वय ८०, रा. कांबळे वस्ती, महाळुंगे पाडाळे) यांनी फिर्याद दिली आहे. ससाणे हे बर्‍याच दिवसांनी आठवडे बाजारात भाजी आणण्यसाठी गेले होते. त्यावेळी गावातील तोंड ओळखीचा मुनिराज पाडाळे हा त्यांच्या जवळ आला व त्याने ससाणे यांना म्हणाला, बाबा मला वाटले तुम्ही गेले वर, यावर ससाणे यांनी त्याला तु असा का बोलतो असे विचारल्यावर त्याने रागात येऊन ससाणे यांना शिवीगाळ केली. त्यांच्या हातातील आधाराची लाकडी काठीने त्यांच्या खांद्यावर, पाठीत मारुन जखमी केले.