Pimpri News : अल्पवयीन मुलीवर नराधम बापाने केला बलात्कार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्याच १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर नराधम बाप गेले अनेक वर्षे विनयभंग करुन तिच्यावर बलात्कार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बापाच्या या त्रासाला कंटाळून या मुलीने २०१३ पासून सुरु असलेला हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर आईने पिंपरी पोलिसांकडे धाव घेऊन आपल्या पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे.

हा सर्व प्रकार २०१३ पासून पिंपरी व कोपरगाव येथे घडला आहे. या मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, ही मुलगी लहान असताना तिचे वडिल आपण एकत्र झोपू असे सांगून झोपायला सांगत. एकत्र झोपल्यावर ते तिची छाती दाबत. तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावत. एकदा त्यांनी तिच्यावर बलात्कार केला.

नाताळच्या सणाला ते कोपरगाव येथे गेले असताना वडिलांनी तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. तेथून ती व आई परत पिंपरीला आले. तिचे वडिल कोपरगाव येथे राहिले असल्याने या मुलीने हिंमत करुन हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.