Pimpri News : धक्कादायक ! भर दिवसा चौकात तरुणींसोबत अश्लिल चाळे, ताथवडे चौकातील घटना, रोडरोमियोला अटक

पिंपरी : रस्त्याने जाणाऱ्या तरुणींची छेडछाड करण्याचे प्रकार सर्वत्र घडतात़. पण आई, भावासह जाणार्‍या अल्पवयीन मुलीबरोबर भर दिवसा सर्वांसमोर ताथवडे चौकात एकाने अश्लिल कृत्ये करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

आसिफ महम्मद शेख (वय २१, रा. भुजबळ वस्ती, ताथवडे, वाकड) असे अटक केलेल्या रोडरोमियोचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.हा धक्कादायक प्रकार शनिवारी सायंकाळी ताथवडे येथील चौकात घडला.ही महिला आपला मुलगा व मुलीसह ताथवडे चौकातून पायी घरी जात होते.यावेळी आसिफ शेख हा अचानक त्यांच्यासमोर आला त्याने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्या गालाचा किस घेतला.त्यानंतर भर चौकात तिच्या अंगावरुन हात फिरवून तिला गच्च पकडून धरुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. शेख याने जाताना तुम्ही माझ्या विरोधात तक्रार दिल्यास तुमचे संपूर्ण खानदानाला जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली.भर रस्त्यावर हा प्रकार घडल्याने हे संपूर्ण कुटुंब भांबावून गेले होते.वाकड पोलिसांनी शेख याला अटक केली आहे.