होय, माझी जीभ घसरली : पियुष गोयल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी नुकतंच एक खळबळजनक विधान केलं होतं. गुरुत्वाकर्षणाचा शोध आईनस्टाईनने लावला आणि त्यात त्याला गणिताची मदत झाली नव्हती असं वक्तव्य गोयल यांनी केलं आहे. या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता.

गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन ने लावला होता. गोयल यांनी आईनस्टाईनचे नाव घेऊन नेटकऱ्यांच्या हाती आयते कोलीत दिले होते. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी जाहीर माफी मागितली. न्यूटनचा उल्लेख करायचा होता मात्र जीभ घसरल्यामुळे अनावधानाने आईनस्टाईनचा उल्लेख झाल्याचे सांगत रेल्वेमंत्री यांनी दिलगीरी व्यक्त केली.

आपल्या चुकीच्या विधानाची कबुली देत गोयल म्हणाले, चुकांतुनच माणूस शिकत असतो, मात्र माध्यमाचा सध्याचा कल हा नकारात्मक गोष्टींकडे जास्त असल्याचेही गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले. राजधानी एक्सप्रेसच्या वाढीव फेऱ्यांसह विविध प्रवासी सुविधांचे लोकार्पण गोयल यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर केले, यावेळी ते बोलत होते.

मुंबई लोकलसाठी १०२ प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर देशभरातील एकूण पायाभूत सुविधांपैकी ५० टक्के काम महाराष्ट्रात सुरू असल्याचे गोयल यांनी यावेळी सांगितले. तसेच येणाऱ्या नवरात्री आणि दिवाळी सारख्या सणांना सीएसएमटी – दिल्ली राजधानी पाच दिवस चालवण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचनाही गोयल यांनी यावेळी दिल्या.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या