काय सांगता ! गुरूत्वाकर्षणाचा शोध आईनस्टाईननं लावला, मंत्री पीयूष गोयलांच्या विधानानंतर ‘खळबळ’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय, त्याला कारणही अगदी तसच आहे. गोयल यांनी नुकतंच एक खळबळजनक विधान केलं आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावताना आईनस्टाईनला गणिताची मदत झाली नव्हती. अस वक्तव्य गोयल यांनी केलं आहे.

या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन ने लावला होता गोयल यांनी आईनस्टाईनचे नाव घेऊन नेटकऱ्यांच्या हाती आयते कोलीत दिले आहे.

या आधीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या ‘ओला’ आणि ‘उबेर’च्या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. सध्याची अर्थव्यवस्थेची गती पाहता ५ ट्रिलयन अर्थव्यवस्था कशी होणार असा प्रश्न गोयल यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना गोयल म्हणाले की, टीव्हीवरील फक्त आकड्यांवर जाऊ नका, आपल्याला ५ ट्रिलियन पर्यंत आपली अर्थव्यवस्था न्यायची आहे त्यासाठी गणिताची गरज नाही. हे पटवून देण्यासाठी त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा दाखला दिला ते म्हणाले आइनस्टाइनला शोध लावताना गणिताची मदत झाली नव्हती.

नेटकऱ्यांनी मात्र त्यांच्या या विधानाची चांगलीच खिल्ली उडवली आहे. पियुष गोयल यांच्यामुळे ट्विटरवर आइनस्टाइन आणि न्यूटन हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर ट्रेण्डिंगमध्ये आले होते.

https://twitter.com/FuschiaScribe/status/1172070269030027265

https://twitter.com/Bhayankur/status/1172068601995522048

आरोग्यविषयक वृत्त –