‘ड्रोन’च्या मदतीनं होणार Pizza पासून ते Vaccine पर्यंतची ‘डिलिव्हरी’, Swiggy सहित आतापर्यंत 20 कंपन्यांना मिळाली प्रयोगाची परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आता तो दिवस फार दूर नाही जेव्हा महत्वाच्या वस्तू ड्रोनद्वारे काही मैलांच्या अंतरावर पोहोचवल्या जातील. असे होऊ शकते की आगामी काळात पिझ्झा (Pizza) पासून ते लसी (Vaccine) पर्यंतची डिलिव्हरी ड्रोनने केली जाईल. नागरी उड्डयन मंत्रालयाने आणखी 7 कंपन्यांना ड्रोन्सच्या लांब अंतराच्या उड्डाणाच्या प्रयोगास परवानगी दिली आहे. ज्यामध्ये फूड वितरण कंपनी स्विगी (Swiggy) चा देखील समावेश आहे. स्विगी Skylark सह मिळून प्रयोग करत आहे. या सुविधेचा प्रारंभ झाल्यामुळे वेळेची बचत होईल आणि लोकांनाही सुविधा मिळेल.

मारुत ड्रोनटेक मेडिकल सप्लायवर करीत आहे काम

मारुत ड्रोनटेक यांना बीव्हीएलओएस (BVLOS) ची परवानगी मिळाली आहे, ते वैद्यकीय पुरवठा करण्याबाबत तेलंगणा सरकारबरोबर काम करत आहेत. कोविड दरम्यान या कंपनीने बरीच कामे केली आहेत. त्यात सुमारे 52 ड्रोन्स कामात आहेत. मारुत ड्रोनटेकने लस पुरविण्याची देखील इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय AutoMicroUAS, Centillion Networks, Terradrone, Virginatech यांनाही BVLOS ची परवानगी मिळाली आहे.

आतापर्यंत 20 कंपन्यांना परवानगी मिळाली आहे

मागील वर्षी 13 कंपन्यांना ड्रोनमधून सप्लाय करण्याची परवानगी मिळाली होती. या कंपन्यांपूर्वी स्पाइसजेट (SpiceJet) ची डिलिव्हरी विंग स्पाइसएक्सप्रेस (SpiceXpress) ला डीजीसीए (DGCA) द्वारा मान्यता देण्यात आली होती. यासह आतापर्यंत एकूण 20 कंपन्यांना अशी परवानगी देण्यात आली आहे.

ड्रोनद्वारे होईल लसीची डिलिव्हरी

नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) ने किफायतशीर विमान कंपनी स्पाइसजेटच्या कार्गो युनिट SpiceXpress ला ड्रोनच्या माध्यमातून ई-कॉमर्स पार्सल डिलिव्हरीची परवानगी मे मध्ये दिली होती. डीजीसीएने दिलेल्या या मंजुरीनंतर आता स्पासजेट ड्रोनच्या मदतीने ई-कॉमर्स पार्सल, मेडिकल, फार्मा आणि इतर आवश्यक वस्तू पुरवण्यास सक्षम असेल. तसेच दुर्गम भागात या वस्तू वितरीत करणे सोपे जाईल.

BVLOS म्हणजे काय?

BVLOS ची बरीच चर्चा ड्रोन इंडस्ट्री (Drone Industry) च्या क्षेत्रात ऐकली जाते. जगभरातील अनेक देश त्यांच्या ड्रोन पॉलिसी (Drone Policy) मध्ये सुधारणा करीत आहेत जेणेकरुन मानव रहित हवाई वाहनांचे (UAV’s) जास्तीत जास्त कार्यक्षमतेने उड्डाण करता येईल. BVLOS फ्लाइट्सना व्हिज्युअल रेंजच्या पलिकडे देखील उडवले जाऊ शकते. तसेच यामुळे ड्रोन्सना अधिक अंतर व्यापण्यास मदत करते. याचा वापर बर्‍याच प्रकारे केला जाऊ शकतो आणि ते खूपच किफायतशीर देखील असते.