अमित शाहंच्या स्वागतासाठी शांतीनिकेतनमध्ये लागलेल्या पोस्टरवरून संताप, जाणून घ्या प्रकरण

कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय बंगाल दौर्‍यावर आहेत. येथे ते भाजपाच्या अनेक कार्यक्रमात आणि रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. अमित शाह यांच्या दौर्‍यामुळे बंगालच्या राजकारणात नवीन गोंधळ सुरू झाला आहे. बीरभूम जिल्ह्याच्या बोलपुर आणि शांतीनिकेतनमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे छायाचित्र रवींद्रनाथ टागोर यांच्यावर दाखवले आहे, यावरून संताप व्यक्त होत असून भाजपावर जोरदार आरोप होत आहेत.

या पोस्टरमध्ये बोलपुरचे माजी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) चे खासदार अनुपम हाजरा यांचेही छायाचित्र होते, जे 2019 मध्ये भाजपामध्ये गेले होते आणि आता भाजपाचे राष्ट्रीय सचिव आहेत. हाजरा सुद्धा विश्व भारतीमध्ये एक विद्यार्थी आणि शिक्षक होते. पोस्टरवर एका सांस्कृतिक संघटनेचे नाव लिहिण्यात आले आहे.

9 डिसेंबरला भाजपाच्या बंगाल युनिटने जेपी नड्डा यांच्या संदर्भाने म्हटले की, टागोरांचे जन्मठिकाण विश्व भारती आहे. नंतर ट्विट हटवण्यात आले. मात्र, टीएमसीने भूमीचा इतिहास जाणून घेण्यास सांगून भाजपा प्रमुखांवर टीका केली आणि म्हटले होते की, नोबेल पुरस्कार विजेते टागोरांचा जन्म कोलकाताच्या जोरासांकोमध्ये झाला होता.

भाजपा नेत्यांनी स्थानिक लोकांच्या विरोधानंतर वादग्रस्त पोस्टर ताताडीने हटवले, ज्यांच्यासाठी टोगोर सांस्कृतिक गौरव आहेत. विश्व भारतीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आक्षेप नोंदवला. मात्र, शाह यांच्या स्वागतासाठी करण्यात येत असलेल्या तयारीची जबाबदारी सांभाळणार्‍या हाजरा यांनी दवा केला की, पोस्टर भाजपाने बनवलेले नाहीत.

हाजरा म्हणाले, हा टीएमसीचा कट आहे. आम्ही शांतिनिकेतनमध्ये मोठे झाले आहोत. मी येथे एक विद्यार्थी होतो. आम्हाला टागोरांना सन्मान कसा द्यायचा माहित आहे. अशाच प्रकारे अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान कोलकातामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर यांची प्रतिमा तोडण्यात आली होती. पोस्टर त्या जागेच्या जवळपास ठेवण्यात आले होते, जिथे रोड शो आणि रॅली आयोजित करण्यात आली आहे.