PM Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या खात्यात 6000 ऐवजी येतील 12000 रुपये, परंतु यांना मिळणार नाही फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PM Kisan | सरकार पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत (PM kisan Samman Nidhi Scheme) शेतकर्‍यांना दरवर्षी 6000 रुपये देते. परंतु मीडिया रिपोर्टनुसार, मोदी सरकार (Modi Government) शेतकर्‍यांना मिळणारा हा लाभ दुप्पट करण्याचा विचार करत आहे. जर असे झाले तर दरवर्षी 6000 रुपयांऐवजी 12000 रुपयांचे तीन हप्ते मिळतील. परंतु काही शेतकरी असेही आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

(PM Kisan) या योजनेत अनेक शेतकरी असे आहेत, जे या योजनेचे नियम आणि अटी पूर्ण करत नाहीत आणि पीएम शेतकरी पीएम किसानचा लाभ घेत आहेत. सरकारने अशा अपात्र शेतकर्‍यांविरूद्ध सक्त कारवाई करण्याचा आदेश जारी केला आहे.

या शेतकर्‍यांना मिळणार नाही लाभ

असे शेतकरी जे माजी किंवा सध्या संविधानिक पद धारक आहेत

वर्तमान किंवा माजी मंत्री आहेत, महापौर किंवा जिल्हा पंचायत अध्यक्ष आहेत, आमदार, खासदार आहेत.

केंद्र किंवा राज्य सरकारमधील अधिकारी आणि 10 हजारेपक्षा जास्त पेन्शन घेणारे शेतकरी यांना लाभ मिळणार नाही.

व्यवसायिक, डॉक्टर, इंजिनियर, सीए, वकील, आर्किटेक्ट, जे शेती करत असले तरी त्यांना लाभ मिळणार नाही.

इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी सुद्धा या लाभापासून वंचित असतील.

केंद्र आणि राज्य सरकारचा मल्टी टास्किंग स्टाफ/चतुर्थ श्रेणी/गट डी कर्मचार्‍यांना लाभ मिळेल.

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी करा रजिस्ट्रेशन

सर्वप्रथम PM Kisan ची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर व्हिजिट करा.

यानंतर Farmers Corner नावाचे एक ऑपशन दिसेल.

नंतर याच्या खाली New Farmer Registration चे ऑपशन दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर नवीन पेज ओपन होईल. ज्यामध्ये Aadhaar number आणि Captcha भरा.

नंतर काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल.

आधारशिवाय रजिस्ट्रेशन होणार नाही.

 

Web Title : PM Kisan | good news farmers will get 12000 rupees under pm kisan only these kisan can take benefits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | ग्रामीण पोलिसांकडून सोमेश्वरनगर, पणदरे, मोरगाव, सुपे, वडगाव निंबाळकर येथे आयोजित महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

PMPML | एमएनजीएल आणि पीएमपी अधिकाऱ्यामध्ये 52 कोटींच्या थकबाकी बाबत उद्या बैठक

PM Narendra Modi | अमेरिकेहून मायदेशी परतताच PM नरेंद्र मोदी करणार ‘ही’ मोठी घोषणा