PM Modi Sabha In Pune | 128 एकरांचे मैदान आणि 2 लाख नागरिक; मोदींच्या सभेसाठी भाजपची जय्यत तयारी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या महाविजय संकल्प सभेचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PM Modi Sabha In Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे (Pune Lok Sabha), शिरूर (Shirur Lok Sabha), बारामती (Baramati Lok Sabha) आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या (Maval Lok Sabha) प्रचारासाठी महाविजय संकल्प सभेचे आयोजन येत्या 29 एप्रिल रोजी वानवडी येथील रेस कोर्स मैदान (Race Course Pune) येथे सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी करण्यात आले आहे. या सभेला महायुतीचे (Mahayuti) दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी माहिती प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pande) यांनी दिली.(PM Modi Sabha In Pune)

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), शिवसनेचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire), शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय भोसले (Sanjay Bhosale), मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar), आरपीआयचे अध्यक्ष संजय सोनावणे (Sanjay Sonavane), पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhimale), महायुती समन्वयक संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), राजेंद्र शिळिमकर (Rajendra Shilimkar) आदी उपस्थित होते.

पांडे म्हणाले, अनेक वर्षानंतर पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असून रेसकोर्स याठिकाणी सभेचे आयोजन केले आहे. सभेच्या माध्यमातून महायुतीच्या चारही उमेदवारांची ही महाविजय संकल्प सभा असणार आहे. 128 एकरांमध्ये ही सभा होणार असून या सभेला 2 लाख नागरिक उपस्थित राहणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, मनसे, आरपीआय यांच्याबरोबर सर्व सहकारी पक्ष सभेच्या तयारीला लागले आहेत. 21 विधानसभा मतदारसंघामधून सभेसाठी कार्यकर्ते येणार असल्याचे पांडे म्हणाले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती
निलम गोर्‍हे मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यासह 3 हजार व्हीआयपी यासभेला उपस्थित राहणार आहेत.
सभेसाठी आठ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांना समाज माध्यमातून गुगल लिंक पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांचे पार्किंग कोठे आहे ते त्यांना समजेल.
कार्यकर्त्यांनी येताना पाण्याची बाटली आणू नये. पाण्याची सोय मैदानात करण्यात आली आहे.
22 ठिकाणी एलइडी लावण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी येण्यापुर्वी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व दरवाजे बंद करण्यात येतील.
त्यामुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांनी 4 वाजून 30 मिनिटापर्यंत सभेच्या ठिकाणी पोहचावे असे पांडे यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Adv Ujjwal Nikam | भाजपाचे धक्कातंत्र! ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी

Murlidhar Mohol | पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पर्वती विधानसभेतील रॅलीला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

Cheating Fraud Case Pimpri Chinchwad | पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करुन व्यावसायिकाची फसवणूक, सांगवी पोलिसांकडून तरुणाला अटक

Praniti Shinde On BJP | सत्ता असताना तीन वेळा उमेदवार का बदलला, प्रणिती शिंदे यांचा भाजपला सवाल

Ajit Pawar On Shriniwas Pawar | सख्खा भाऊ विरोधात का गेला, अजित पवारांनीच सांगून टाकलं श्रीनिवास पवार काय म्हणाले होते, तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो