… म्हणून योगदिन साजरा करण्यासाठी रांचीची निवड, PM मोदींनी सांगितली ‘ही’ 3 कारणे

रांची : वृत्तसंस्था – आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रांची येथे योगाचे धडे घेत योग दिन साजरा केला. मोदींनी यावेळी तेथील उपस्थित लोकांशी संवाद साधला. मोदींनी आपल्या भाषणात योगासाठी रांचीच का निवड केली यावर स्पष्टीकरण दिले.

अनेक देशामध्ये योग दिवस साजरा केला जात आहे. जगभरात योगाचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. शिवाय योगासाठी येथे येण्याचा वेगळाच आनंद आहे, असं मोदींनी सांगितलं. तसंच योग दिवस साजरा करण्यासाठी रांची का निवडली याबद्दलही सांगितलं.

रांची हे राज्य निसर्गरम्य आहे. योगासाठी हे उपयुक्त आहे. त्यामुळे रांचीची निवड केली. तसचं सरकारची आयुष्यमान योजनेची सुरुवात रांचीमधून झाली होती. त्यामुळे योग दिवस येथेच साजरा करण्याचा निर्णय घेतला. तर रांची आणि आरोग्य यांच्यातील नात्याचा उल्लेख इतिहासात आहे, असं त्यांनी सांगितलं.

https://twitter.com/ANI/status/1141877721242300416

आपल्याला योग वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवला पाहिजे. तसंच घराघरात योगा पोहचवले पाहिजेत. झारखंडमध्ये योग आमच्या संस्कृतीचा एक भाग आहे, हे नृत्याद्वारे केले जाते. शरीराला शक्ती देते. आता आपल्याला शहरातील गावातून आधुनिक योगाचा प्रवास करावा लागेल जेणेकरून आदिवासी जीवनाचा योग अविभाज्य भाग बनेल, असंही त्यांनी म्हटलं.

विविध योग जीवनाचा एक भाग असेल तर रोग कमी होईल. जीवन केवळ औषधांद्वारेच जगू नये. आपण आजारांपेक्षा आरोग्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

महत्त्वाच्या बातम्या 

राज्यातील ओबीसींची जनगणना करण्याची मागणी

‘किडनी’ घ्या पण, बियाणे द्या, विधानसभेत धनंजय मुंडेंनी मांडली शेतकऱ्याची व्यथा

विधासभेच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर करणार मोठी घोषणा, आज घेणार पत्रकारपरिषद

वाराणसी आता मांसाहाराच्या सेवनावर बंदी