PM Shram Yogi Man Dhan pension | रोज 2 रुपये जमा करून मिळवा 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या डिटेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM Shram Yogi Man Dhan pension) असंघटित क्षेत्राशी संबंधीत कामगार, मजूर, श्रमिक इत्यादींसाठी एक महत्वाची योजना आहे. ही योजना फेरीवाले, रिक्षा चालक, बांधकाम मजूर आणि अशाच प्रकारची इतर कामे करणार्‍या असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी आहे. (PM Shram Yogi Man Dhan pension)

यातून त्यांना वृद्धपकाळ सुरक्षित करण्यात मदत होते.
सरकार पेन्शनची गॅरंटी देते. या योजनेत 2 रुपये वाचवून वार्षिक 36000 रुपयांची पेन्शन मिळवू शकता.

55 रुपये दरमहिना जमा करा

या योजनेत वेगवेगळ्या वयाच्या हिशेबाने 55 रुपये ते 200 रुपये मंथली योगदानाची तरतूद आहे.
जर तुम्ही या योजनेत 18 व्या वर्षी सहभागी झालात तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 55 रुपये योगदान द्यावे लागेल.
तर 30 वर्ष वय असणार्‍यांना 100 रुपये आणि 40 वर्ष वय असणार्‍यांना 200 रुपये योगदान द्यावे लागेल. जर 18 वर्ष वय असेल तर वार्षिक योगदान 660 रुपये असेल. असे 42 केल्यानंतर एकुण गुंतवणूक 27,720 रुपये होईल.
ज्यानंतर प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये पेन्शन आजीवन मिळेल.
जेवढे योगदान खातेदाराचे असेल तेवढे योगदान सरकार करेल.

आधार कार्ड हवे

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल.
या स्कीममध्ये 18 ते 40 वर्ष वयाचे लोक सहभागी होऊ शकतात.

येथे होईल रजिस्ट्रेशन

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जावे लागेल.
यानंतर तेथे आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल.
पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंटट दाखवू शकता. खाते उघडताना ऑनलाइन नॉमिनी सुद्धा नोंदवू शकता.

 

द्यावी लागेल ही माहिती

जर तुमचे (EPF / NPS / ESIC) ईपीएफ / एनपीएस / ईएसआयसी खाते अगोदरपासूनच असेल तर हे खाते उघडता येणार नाही.

हे घेऊ शकतात योजनेचा लाभ

पीएम-एसवायएम योजनेत असंघटित क्षेत्रातील लोक खाते उघडू शकतात.
किंवा असे लोक ज्यांचे उत्पन्न 15 हजार रूपयांपेक्षा कमी आहे. वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे.

टोल फ्री नंबरवर घ्या माहिती

तुम्ही योजनेची माहिती 1800 267 6888 टोल फ्री नंबरवर सुद्धा घेऊ शकता.

 

Web Title : pm shram yogi man dhan pension deposit rs 2 per day and get rs 36000 pension know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

TokyoOlympics | हॉकीतील भारताचे गोल्डचे स्वप्न भंगले, आता ब्रॉन्जसाठी लढाई

Fact Check | जर तुमच्याकडे आहे ‘आधार’ तर मोदी सरकार देतंय 1 टक्का व्याजावर कर्ज, जाणून घ्या वायरल मेसेजचे ‘सत्य’

Pune Corporation | कात्रज परिसरातील ‘उत्कर्ष’ मधील नागरिकांचा जीव धोक्यात; आधी रस्ता नंतर ‘ड्रेनेज’साठी खोदाई