PMC GST Income | महापालिकेला चालू आर्थिक वर्षात GST तून 150 कोटी रुपये अधिक मिळणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) मिळकत कर आणि बांधकाम विभागाने मागीलवर्षी ऐतिहासिक उत्पन्न मिळविले आहे.
चालू आर्थिक वर्षातही मिळकत करातून भरिव उत्पन्न मिळण्याचे संकेत असतानाच जीएसटीच्या Goods and Services Tax (GST)
माध्यमातूनही सुमारे १५० कोटी रुपये अधिकचे उत्पन्न (PMC GST Income) मिळणार असल्याने आर्थिक आघाडीवर महापालिकेच्या भरभराटीची चिन्हे दिसत आहेत. (PMC GST Income)

 

महापालिकेच्या उत्पन्नामध्ये मिळकत कर,
बांधकाम परवानगी आणि जीएसटीच्या माध्यमातून शासनाकडून मिळणार्‍या हिश्श्याचा समावेश आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सलग दोन वर्षे आर्थिक आघाडीवर अन्य महापालिकांच्या तुलनेत उजवी कामगिरी करणार्‍या पुणे महापालिकेने मागीलवर्षी प्रथमच उत्पन्नाचा सहा हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
यामध्ये मिळकत कर विभागाने अठराशे कोटी रुपयांहून अधिक तर बांधकाम विभागाने दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवत अंदाजपत्रकातील अंदाजापेक्षा अधिकचे उत्पन्न प्राप्त केले.
जीएसटीच्या माध्यमातूनही पालिकेला प्रतिमहिना १६५ कोटी रुपयांप्रमाणे १ हजार ९८० कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.
(PMC GST Income)

यावर्षी मात्र, पहिल्याच महिन्यांत जीएसटीच्या हिश्श्यापोटी १७८ कोटी रुपये मिळाले असून पुढील वर्षभर दरमहा एवढीच रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे.
साधारण वर्षभरामध्ये २ हजार १३६ कोटी रुपये महापालिकेला मिळणार असून मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही रक्कम १५६ कोटी रुपयांनी अधिक राहणार आहे,
अशी माहिती महापालिकेच्या मुख्य लेखाधिकारी उल्का कळसकर यांनी दिली.

 

 

Web Title :- PMC GST Income | Pune Municipal Corporation (PMC) will get Rs 150 crore more from GST in the current financial year

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा