PMPML Employees-Diwali Bonus | खुशखबर ! पीएमपीएमएलच्या कर्मचार्‍यांनाही बोनस जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PMPML Employees-Diwali Bonus | पीएमपी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच खुशखबर मिळाली आहे. पीएमपी संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या प्रस्तवाला मान्यता दिली आहे. पीएमपी कर्मचाऱ्यांना मूळ वेतन आणि महागाई भत्ता यावर ८.३३ टक्के प्रमाणे अनुदान आणि २१ हजार रुपये बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. बोनसची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीपूर्वी जमा होईल. (PMPML Employees-Diwali Bonus)

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केल्यानंतर पीएमपी कर्मचाऱ्यांना सुद्धा बोनस जाहीर करावा, अशी मागणी विविध कामगार संघटनांनी केली होती. त्यानुसार पीएमपी संचालक मंडळाने बोनसच्या प्रस्तावाला बैठकीत मान्यता दिली.

पीएमपीएल कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर पीएमपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
सचिन्द्र प्रताप सिंह यांनी म्हटले की, पीएमपीएमएलचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे ३ महिन्यांत
जवळपास सर्व शेड्युल मार्गस्थ होवून प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा देण्यात आम्ही यशस्वी झालो. यापुढील काळातही प्रवासी केंद्रीत सेवा देण्यासाठी कर्मचारी सांघिक प्रयत्न करतील. त्यामुळे पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सानुग्रह अनुदान व बक्षिस रक्कम देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कंपनीचा संचालक बोलत असल्याचे सांगून 66 लाखांची फसवणूक, पुणे सायबर पोलिसांकडून बिहार येथून दोघांना अटक

Congress Leader Mohan Joshi On Maharashtra Govt | बोलघेवडे भाजप नेते गप्प का? सरकार कोणत्या मंत्र्याला वाचवतंय? माजी आमदार मोहन जोशी यांचा खडा सवाल