PMPML Ticketing Facility-G Pay-PhonePe | पीएमपीमध्ये लवकरच गुगल पे, फोन पे वापरुन काढता येणार तिकीट

पोलीसनामा ऑनलाइन – PMPML Ticketing Facility-G Pay-PhonePe | सध्याच्या डिजीटल युगामध्ये ऑनलाइन पेमेंट मोडला लोकांची खास पसंती मिळत आहे. अगदी लहान लहान व्यवहार देखील डिजीटल पेमेंट द्वारे केले जात आहेत. लोकांची ही पसंती लक्षात घेत पुण्याच्या प्रवासासाठी जीवनदायिनी समजली जाणारी पीएमपीएमएल ही देखील डिजीटल विश्वामध्ये पदार्पण करत आहे. पीएमपी ही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक बससेवा पुरवते. या दोन्ही शहरांतून सुमारे दहा ते बारा लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. याशिवाय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ग्रामीण भागाच्या हद्दीमध्ये पीएमपीकडून बस सेवा दिली जाते. दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असलेल्या या पीएमपीमध्ये गुगल पे व फोन पे द्वारे तिकीटे काढता येणार आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय हा काही दिवसांमध्ये घेतला जाणार आहे. (PMPML Ticketing Facility-G Pay-PhonePe)

पीएमपी बसमध्ये अगदी 5 रुपये,10 रुपये किंवा15 रुपये देखील तिकीट दर आहे. यामुळे बस वाहक आणि प्रवाशांमध्ये नेहमी सुट्टे पैशांवरुन वाद निर्माण होत असतो. तसेच जर पैसे जवळ नसतील तरी देखील बस प्रवास करता येत नाही. ही बाब लक्षात घेत पीएमपी बसकडून आता गुगल पे, फोन पे अशा मोबाईल एपच्या मदतीने तिकीट काढण्याची सुविधा लवकरच दिली जाणार आहे. गुगल पे, फोन पे असे एप हे अगदी छोट्या छोट्या व्यवहारांसाठी देखील आता सर्रास सर्वत्र वापरले जात आहे. या पेमेंट मोडची लोकप्रियता वाढली असून जवळजवळ प्रत्येक बॅंक खातेदार ही सुविधा वापरत आहे. यामुळे पीएमपी बसमध्ये देखील ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा पुरवली जाणार आहे. (PMPML Ticketing Facility-G Pay-PhonePe)

त्यामुळे यापुढे जवळ कॅश नसताना आणि सुट्टे पैसे नसताना देखील पीएमपी बसचे तिकीट काढता येणार आहे आणि
प्रवास सोयीस्कर होणार आहे. डिजीटल पेमेंटमुळे तरुणाई देखील पीएमपी बसकडे आकर्षित होण्यास मदत होणार आहे.
याबाबत पीएमपीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली असून येत्या काही दिवसांत त्याबाबतचा निर्णय घेण्यात येऊन
निर्णयाची अंमलबाजवणी सुरू होणार आहे. ऑनलाइन व्यवहारांचा वाढता उपयोग लक्षात घेत पीएमपीने हे पाऊल
उचलले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

OTT Release Marathi Movie | ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात ‘हा’ धमाल कॉमेडी चित्रपट रिलीज; चित्रपटाच्या विषयाने वेधले लक्ष