PMRDA | अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा, बावधन येथील 5 गाळे जमीनदोस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीत बांधकामासाठी पीएमआरडीएच्या वतीने अनाधिकृत बांधकाम (Unauthorized Construction) निष्कासन विभागाची परवानगी घ्यावी लागते. मात्र परवानगी न घेता बांधकाम केले असता अनाधिकृत बांधकाम निष्कासन विभागामार्फत कारवाई करण्यात येते. मौजे बावधन बु. (Bavadhan) तालुका हवेली येथील गट नंबर 11 मध्ये बांधलेल्या 1100 चौरस फुटातील अनधिकृत 5 वाणिज्य गाळ्यांवर पीएमआरडीएच्या (PMRDA) वतीने हातोडा मारण्यात आला.

 

कारवाईसाठी पोकलेचना वापर करण्यात आला. त्यावेळी उपस्थित पीएमआरडीएच्या (PMRDA)
अधिकाऱ्यामार्फत बांधकामधारकांना परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम करण्यात येऊ नये
असे आवाहन अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग (Unauthorized Construction Department),
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे मार्फत करण्यात आले.

कारवाई करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामधारकांकडून अनधिकृत बांधकाम
निष्कासनाचा खर्च वसूल केला जाईल असे सांगण्यात आले.
निष्कासन कारवाई करतेवेळी पीएमआरडीएचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title :- PMRDA | PMRDA’s strong action on unauthorized construction, 5 flats at Bawadhan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा