PNB ची ग्राहकांसाठी खास योजना ! दरमहा 5 हजार रुपये गुंतवणुकीवर 68 लाखाचा लाभ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब नॅशनल बँक (PNB) हि एक भारतातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेने ग्राहकांसाठी एक बेस्ट योजना आणली आहे. ती योजना म्हणजे राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (NPS) होय. या योजनेअंतर्गत ग्राहक पैसे गुंतवू शकते. एखादी रक्कम गुंतवल्यावर त्या ग्राहकाच्या निवृत्तीनंतर ६८ लाख रुपये एकरकमी रक्कम त्याला मिळणार आहे. PNB बँकेच्या या योजनेमध्ये ग्राहकाला संरक्षित गुंतवणुकीसह आणि काही वेगळा लाभ देखील मिळणार आहे.

काय आहे NPS स्कीम ?
ही स्कीम एक सरकारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारने २००४ साली तयार केली होती. तसेच २००९ रोजी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी ही योजना ओपन केली आहे. तर, सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात काम करणारा कर्मचारी त्यांच्या इच्छेनुसार या योजनेत सहभागी होऊ शकणार आहे.

या योजनेपासून लाभ काय ?
> PNB बँकेची खास योजना असणाऱ्या NPS मध्ये पैसे गुंतवून ग्राहक निवृत्तीनंतर टेन्शन फ्री आयुष्य जगू शकतो.
> आकर्षक बाजाराशी निगडित परतावा मिळतो
> हा पेन्शन फंड आणि गुंतवणूकीचा पर्याय आहे.
> आयकर कायदा ८० सीसीडी (1B) अन्वये यात ५० हजार रुपयांची अतिरिक्त सवलत मिळते.
> ही सूट ८० सी अंतर्गत असणाऱ्या दीड लाखाच्या सवलतीव्यतिरिक्त आहे.

या योजनेत कोण गुंतवणूक करू शकतं ?
NPS स्कीममध्ये १८-६० या वयोगटातील असणारे कर्मचारी आपली रक्कम गुंतवू शकतात. भारतातील जवळजवळ सर्वच सरकारी, खाजगी बँकांमध्ये या योजनेमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते.

असे मिळणार ६८ लाख रुपये –
ग्राहकाला या योजनेअंतर्गत प्रति महिना ५ हजार रुपये एवढी गुंतवणूक ही ३० वर्षाकरिता करावी लागते. तसेच ग्राहकाचे एकूण योगदान १८ लाख रुपये होणार आहे. यामध्ये समजा ग्राहकाला गुंतवणुकीवर १० % प्रमाणे एक अंदाज परतावा मिळाला तर मॅच्युरिटीची एकूण रक्कम १.१३ एवढी कोटी रुपये असणार आहे.

याचप्रमाणे एकूण रक्कम कशी मिळेल?
> ॲन्युटीची खरेदी ४० %
> अंदाजित ॲन्युटी रेट 8 %
> टॅक्स फ्री विड्रॉल मॅच्युरिटी अमाउंटच्या 60 %
> ६० वर्षांचे झाल्यावर पेन्शन रक्कम प्रति महिना ३०,३९१
> एकरकमी रोख रक्कम – ६८.३७ लाख रुपये

मॅच्युरिटीपूर्वी रक्कम काढण्याची सेवा –
नॅशनल पेन्शन स्कीममध्ये ग्राहक काही ठराविक परिस्थितीत मॅच्युरिटीपूर्वी सुद्धा रक्कम काढू शकणार आहे. समजा ग्राहकाला नवीन उद्योग सुरू करायचाय अथवा घर खरेदी करण्याची योजना आखत असेल तेव्हा ग्राहक ती रक्कम काढू शकणार आहे. याव्यतिरिक्त लग्न, मुलांचं शिक्षण आणि लिस्टेड आजारांच्या उपचारासाठी देखील त्यामधील रक्कम काढू शकणार आहे.