Pneumonia Outbreak | चीनमध्ये न्यूमोनियाचा उद्रेक! महाराष्ट्रातही आरोग्य यंत्रणा अलर्ट, फुफ्फुसांना जपा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- Pneumonia Outbreak | सध्या चीनच्या ईशान्य भागात न्यूमोनियाचा उद्रेक झाला आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या मोठी असल्याने हे नवीन आरोग्य संकट गंभीर झाले आहे. ही साथ इन्फ्लूएंझा, मायक्रोप्लाझा व कोविडची आहे. दरम्यान, यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना न्युमोनियाबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. यानंतर राज्य हिवताप सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी सर्व जिल्हयांना उपाय योजनांचे आदेश दिले आहेत. (Pneumonia Outbreak)

केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी सर्व राज्यांना कळवले आहे की, या न्यूमोनिया आजाराचे प्रमाण मुख्यत: लहानमुलांमध्ये अधिक दिसते. हा संसर्ग इन्फ्लुएंझा, मायकोप्लाझ्मा न्युमोनिया, आरएसव्ही आणि कोविडमुळे होताना दिसत आहे. चीनमधील या उद्रेकाची भिती आपल्याला नसली तरी आपली आरोग्य व्यवस्था पूर्व तयारी करण्याची आवश्यकता आहे. केंद्राच्या या निर्देशानंतर राज्याने जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश दिले आहेत. (Pneumonia Outbreak)

राज्याने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, सर्वेक्षण करा. प्रत्येक जिल्हा आणि महापालिकेने आपापल्या क्षेत्रातील श्र्वसनसंस्था आजारांचे सर्वेक्षण गांभीर्यपूर्वक करावे. आयएलआय/ सारी संदर्भातील माहिती आयडीएसपी पोर्टलवर अद्ययावत करावी. कोविड सर्वेक्षणासाठी ऑपरेशनल गाइडलाइन्स फॉर रिवाइज्ड सर्विलन्स इन कंटेक्स्ट ऑफ कोविड – १९ या राष्ट्रीय नियमावलीचा वापर करावा. आपल्या कार्यक्षेत्रातील निदान प्रयोगशाळांना आयएलआय / सारी रुग्णांचे नमुने नियमित स्वरूपात पाठवण्यात यावे.

या आदेशात म्हटले आहे की, रुग्णालयीन पूर्वतयारी आपल्या कार्यक्षेत्रातील रुग्णालये या पद्धतीचा उद्रेक हाताळण्यासाठी
सुसज्ज ठेवणे गरजेचे आहे. मनुष्यबळ, त्यांचे प्रशिक्षण, ऑक्सिजन उपलब्धता, ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत किंवा कसे,
व्हेंटिलेटर उपलब्धता, अतिदक्षता विभागातील सिद्धता, रुग्णालयीन संसर्ग प्रतिबंधक यंत्रणा याबाबत आपण जातीने
लक्ष घालून खातर जमा करावी.

आदेशात पुढे म्हटले आहे की, आवश्यक औषधांचा पुरेसा साठा, लसी, पीपीई किट, निदानासाठी लागणारे किट,
ऑक्सिजन सिलिंडर्स आणि इतर बाबी पुरेशा प्रमाणात आहेत याची शहानिशा करावी.
आवश्यक यंत्रसामग्री कार्यरत राहील याची दक्षता घ्या. आवश्यक तेथे किरकोळ दुरुस्ती करून घ्या.
सोबत जनतेचे आरोग्य शिक्षण करावे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांची ठाकरे गटावर थेट टिका, म्हणाले – ”नालायकांनो आपला पक्ष सांभाळा, आता त्याच पद्धतीनं उत्तर देऊ”

Amit Shah On CAA | CAA आणणारच, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, अमित शाह यांच्या वक्तव्याने मोठ्या वादाची शक्यता