Police Accident News | कर्तव्य बजावून घरी जात असताना पोलीस अधिकाऱ्याचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू, नाशिक पोलीस दल हळहळले

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –Police Accident News | कर्तव्य बजावून घरी जात असताना लष्काराच्या वाहनाची (Army Vehicle) धडक सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने API Kundan Sonone (रा. इंदिरानगर) यांच्या दुचाकीला बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन सोनोने यांचा मृत्यू झाला. हा अपघात (Police Accident News) वडनेर परिसरात लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी (दि.21) सायंकाळी सहाच्या सुमारास झाला. लष्कराच्या टेम्पोची धडक सोनोनेंच्या दुचाकीला बसल्याने सोनोने चका खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. जवानांनी सोनोने यांना उपचारासाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये (Military Hospital) दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच कुंदन सोनोने यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सोनोने कुटुंबियांसह नाशिक पोलीस (Nashik Police) दलावर शोककळा पसरली आहे.

कुंदन सोनोने हे नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station)
सहायक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) पदावर मागील तीन महिन्यांपासून कार्यरत होते.
दिवसभर कर्तव्य बजावून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन घरी निघाले होते. वडनेर रोड परिसरात ते आले असता लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ सोनोने यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी थेट लष्कराच्या ट्रकच्या चाकाखाली पाठीमागून शिरली. अपघात झाल्याचे लक्षात येताच चालकाने जागीच ब्रेक लावला. त्यानंतर जवानांनी सोनोने यांना गाडीच्या बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. (Police Accident News)

कुंदन सोनोने यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच नाशिक पोलीस दलात शोककळा पसरली.
सोनोने हे 2000 बॅचचे पोलीस अधिकारी होते. गेल्या 23 वर्षापासून ते पोलीस दलात कार्यरत होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Home Remedies For Snoring | ‘या’ 5 घरगुती उपायांनी होईल घोरण्याची समस्या कायमची दूर, घोरण्यापासून मिळेल लवकरच आराम…

Benefits Of Lukewarm Water | ‘हे’ आहेत रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे, आठवड्याभरात दिसून येईल परिणाम.

किरकोळ कारणावरुन कॉलेज तरुणांमध्ये राडा, तरुणाच्या डोक्यात वार; आण्णासाहेब मगर कॉलेज जवळील घटना