Pune Pimpri Chinchwad Crime News | किरकोळ कारणावरुन कॉलेज तरुणांमध्ये राडा, तरुणाच्या डोक्यात वार; आण्णासाहेब मगर कॉलेज जवळील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | किरकोळ कारणावरुन वाद होऊन कॉलेज तरुणांमध्ये (College Youth) हाणामारी झाली. यामध्ये एका तरुणाला चार जणांच्या टोळक्याने लोखंडी हत्याराने, विटांनी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार बुधवारी (दि.20) दुपारी बाराच्या सुमारास आण्णासाहेब मगर कॉलेजच्या (Annasaheb Magar College) मागील बाजूस घडला. याप्रकरणी तिघांवर हडपसर पोलीस (Pune Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत युवराज देवराज भंडारी (रा. लक्ष्मी नगर, शेवाळवाडी, मांजरी फार्म, पुणे) याने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन तेजस नांगरे व त्याच्या सोबत असलेल्या इतर दोन ते तीन जणांवर आयपीसी 324, 323, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवराज भंडारी आणि आरोपी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. भंडारी याचा आरोपी नांगरे याला धक्का लागला. त्यामुळे दोघांमध्ये किरकोळ वाद होऊन बाचाबाची झाली. याच कारणावरुन आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी हत्याराने, विटांनी व लाथाबुक्क्यांनी युवराज याच्या डोक्यात, हातावर, तसेच पाठीवर बेदम मारहाण करुन जखमी केले. तसेच त्याला शिवीगाळ करुन ‘यावेळी सोडतो पण परत जर नडला तर हात पाय तोडून मारुन टाकीन, अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस हवालदार एम.जी. सकट (Police Constable M.G. Sakat) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

डोळा मारुन अश्लील हातवारे केल्याप्रकरणी एकाला अटक, मंगळवार पेठेतील प्रकार

सिंगापूरमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने 11 लाखांची फसवणूक, दोघांवर FIR; कात्रजमधील प्रकार

Pune Pimpri Chinchwad Crime News | बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन मित्राचा खून, बालेवाडी येथील घटना

विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला हिंजवडी पोलिसांकडून अटक, 1 पिस्टल 1 काडतुस जप्त

Girish Mahajan | जरांगे ‘सोयरे’ शब्दावर ठाम, सरकारसोबतची चर्चा निष्फळ, गिरीश महाजन म्हणाले…

महिलेसोबत गैरवर्तन करुन विनयभंग, दोघांवर गुन्हा दाखल; महंमदवाडी परिसरातील प्रकार