साऊथ इंडियन अ‍ॅक्ट्रेस VJ चित्राच्या पतीला अटक !

पोलीसनामा ऑनलाइन – तमिळमधील टीव्ही अ‍ॅक्ट्रेस व्हीजे चित्रा (V. J. Chitra) गेल्या बुधवारी सकाळी हॉटेल्यच्या रूम मध्ये मृत अवस्थेत आढळून आली होती. आता या प्रकरणी पोलिसांनी चित्राला अटक केली आहे. चित्राच्या आईनं हेमंतवर आरोप केला होता की, त्यानं तिच्या मुलीचा छळ केला होता. यामुळंच तिनं आत्महत्या केली. आता पोलिसांनी चित्राचा पती हेमंतला कथितपणे तिला सुसाईडसाठी उकसवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही अ‍ॅक्ट्रेस व्हीजेनं आत्मकेल्याचं कारण आर्थिक अडचण असू शकतं. रिपोर्टनुसार, हेमंत विरोधात कलम 306, आत्महत्येसाठी उकसवल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली होती. त्याला पूनमल्ली न्यायालयाच्या मजिस्ट्रेट समोर हजर करण्यात आलं आणि पोन्नेरी जेलमध्ये ठेवण्यात आलं. ईव्हीपी फिल्म सिटी, चेन्नई जवळ एका खासगी हॉटेलात चित्रानं आत्महत्या केली होती.

एका वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, एका टीव्ही मालिकेत चित्रानं दिलेल्या इंटिमेटच सीनमुळं हेमंत नाराज होता. असिस्टंट कमिश्नर सुदर्शन यांनी सांगितलं की, चित्रानं दिलेल्या एका सीनमुळं पती नाराज होता आणि ज्या दिवशी चित्रानं आत्महत्या केली त्या दिवशीच त्यानं तिच्या सोबत गैरवर्तन केलं होतं. चित्रानं आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी चित्राचे मित्र आणि हेमंतची चौकशी केली होती. या चौकशीनंतरच हेमंतला अटक झाली आहे.

हेमंत आणि चित्रा यांनी ऑगस्टमध्ये साखरपुडा केला होता. दोघांनी ऑक्टोबरमध्ये रजिस्टर्ड लग्न केलं होतं. त्यांचं औपचारिक लग्न फेब्रुवारी 2021 मध्ये होणार होतं. तिचं खरं नाव चित्रा कामराज आहे.