…अन् ‘त्या’ तरुणीसाठी पोलीस ठरले देवदूत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लॉकडाउनमध्ये मानसिक आजारातून किंवा नैराश्यातूनही अनेक आत्महत्या झाल्याची माहिती समोर आली होती. त्यातच नवी मुंबईतील वाशी या भागात एक महिला आत्महत्येचा प्रयत्न करत असतानाचा व्हिडीओ रविवारी (दि. 3) समोर आला आहे. व्हिडीओमध्ये ही महिला इमारतीच्या टॅरेसवर उभी असून उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. सुदैवाने पोलिसांनी योग्य वेळी घटनास्थळी धाव घेतल्याने तीचा जीव वाचला आहे.

सोनल त्रिवेदी असे या महिलेचे नाव असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, सोनल त्रिवेदी या महिलेने रविवारी इमारतीच्या टेरेसवर उभी राहून आत्महत्या करण्याच्या तयारीत होती. सुदैवाने या घटनेची माहिती माहिती मिळताच फायरब्रिगेड आणि पोलीस कर्मचारी योग्य वेळेत घटनास्थळी धाव घेतले. त्यामुळे तीचा जीव वाचला आहे. ती कोणालाही आपल्या जवळ येण्यास विरोध करीत होती. मात्र फायरब्रिगेड आणि पोलीस कर्मचा-यांनी तीची समजूत काढत होते. यातून महिलेचा जीव वाचला आहे. दरम्यान महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार महिला मानसिकदृष्ट्या आजारी आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहे.