Police Constable Dies Heart Attack | पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Police Constable Dies Heart Attack | Policeman dies of heart attack

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – Police Constable Dies Heart Attack | रात्र बंदोबस्तावर असताना अचानक त्रास होऊ लागल्याने घरी गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस शिपाई रामेश्वर राजाराम गामने (वय-39 रा. चिंचपाडा, कल्याण) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रामेश्वर गामने यांच्या अकस्मिक मृत्यूमुळे पोलीस दल व मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.

रामेश्वर गामने हे महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नेमणुकीला होते. रविवारी रात्री बडी रात बंदोबस्ता करिता
कर्तव्यावर हजर होते. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते घरी गेले.
सकाळी सातच्या सुमारास त्यांना उलटी व मळमळ त्रास जाणवू लागला. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

रामेश्वर काहीच बोलत नसल्याचे पाहून त्यांच्या पत्नी वंदना गामने यांनी तातडीने नातेवाईकांना बोलावून घेतले. नातेवाईकांनी गामने यांना तातडीने नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र तेथील डॉक्टरांनी गामने यांना तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
गामणे यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | पिंपरी : ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने जिम ट्रेनरला 35 लाखांचा गंडा

CM Eknath Shinde | ”लिमीटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतोच मी…”, नाना पटोलेंशी बोलतानाचा मुख्यमंत्र्याचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Pune Dhayari Crime | कामगारांचे पैसे देण्यास उशीर केल्याने तरुणाला मारहाण, धायरी परिसरातील घटना

Total
0
Shares
Related Posts