लायन्स क्लब ऑफ पुणे यशोधनच्या वतीने पोलिसांना नाष्टा, चिक्की वाटप

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

लायन्स क्लब ऑफ पुणे यशोधन तर्फे आज (रविवार) ‘निर्माल्य दान’ आणि पोलिसांना नष्टा, चिक्की वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सकाळी नष्टा आणि चिक्कीचे वाटप करण्यात आले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b9874b0-bf38-11e8-b0c3-3f30616bbd2b’]

लायन्स क्लब ऑफ पुणे यशोधनच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. पुणे शहरामध्ये आज गणेश विसर्जनामुळे मोठा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेततेसाठी पोलीस अहोरात्र झटत असतात. आपण ही समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून क्लबच्या वतीने आज भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नाष्टा आणि चिक्की वाटप करण्यात आले.

[amazon_link asins=’B072LJVGQC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’32e9b248-bf38-11e8-8872-f155d14b72ee’]

तर विसर्जन घाटावर नदी पात्रात निर्माल्य टाकले जाते. त्यामुळे प्रदुषण होते. हे प्रदुषण टाळण्यासाठी क्लबच्या वतीने ‘निर्माल्य दान’ उपक्रम राबविण्यात आला. नदी पात्रात पडणारे निर्माल्य रोखण्यासाठी व गोळा करण्यासाठी तसेच समाज प्रबोधन करण्याचे काम क्लबच्या वतीने करण्यात आले. क्लबच्या वतीने दत्तवाडी घाटावर निर्माल्य दान हा उपक्रम राबवून निर्माल्य जमा करण्यात आले. निसर्गाचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे याच भावनेतून हा उपक्रम क्लबच्या वतीने राबविण्यात आला आहे.

सर्व नियमांना झुगारून पुण्यात डिजेचा ‘दणदणाट’

यावेळी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रमेश शहा, रोटरीयन आर.के. शेख, गोपाळ राठी, गोविंद काळे, राजेंद्र काळे, महेंद्र शर्मा, सागर गिल्डा, रासकर रविंद्र, जुगलकिशोर काळे, श्रीराम गोयल, भुपेंद्र भोंडवे, कमल किशोर आदींनी उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.