Police Patil Meeting In Pimpri | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस पाटील मेळावा व कार्यशाळ संपन्न

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey) यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. 21) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police Commissionerate) हद्दीतील पोलीस पाटील यांचा मार्गदर्शन मेळावा व कार्यशाळा कार्यक्रम (Police Patil Meeting In Pimpri) देहूरोड पोलीस स्टेशन (Dehu Road Police Station) अंतर्गत देहुगांव येथील संत तुकाराम मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (IPS Vasant Pardeshi) यांनी पोलीस पाटलांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात (Police Patil Meeting In Pimpri) मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्तालय हद्दीतील 80 पोलीस पाटील उपस्थित होते.

यावेळी पिंपरी चिंचवड सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट (ACP Padmakar Ghanwat), महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब बाजीराव शिंदे पाटील, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी पोलीस पाटील संघाच्या अध्यक्ष तृप्ती मांडेकर पाटील, खेड तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष अमोल पाचपुते पाटील, मावळ तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष लक्ष्मण शितोळे पाटील उपस्थित होते. (Police Patil Meeting In Pimpri)

प्रमुख वक्ते व मार्गदर्शक सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक डॉ राम पठारे
(Retired DySP Dr. Ram Pathare) व राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील
यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशांत करंडे पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन अमोल पाचपुते पाटील यांनी केले. तर सर्व उपस्थित यांचे आभार देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी (PI Digambar Suryavanshi) यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raigad Irshalwadi Landslide | इर्शाळवाडी दुर्घटनेत 10 लाखांची मदत द्यावी,
नाना पटोलेंची मागणी