‘साहित्य संमेलना’च्या गोंधळादरम्यान पोलिसांकडून पत्रकाराला ‘धक्काबुक्की’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – उस्मानाबादमध्ये साहित्य संमेलनात झालेल्या गोंधळादरम्यान पोलिसांकडून पत्रकाराला धक्काबुक्की झाली आहे. पत्रकार आहोत हे सांगितल्यानंतरही पोलिसांनी त्याला धक्काबुक्की केली आहे असेही बोलले जात आहे. काही वेळापूर्वीच परिसंवादादरम्यान गोंधळ झाला होता. अशात हा दुसरा वाद समोर आला आहे.

उस्मानाबादमध्ये सध्या साहित्य संमेलन सुरू आहे. संमेलनात वाढत्या बुवाबाजीवर परिसंवाद सुरू होता. यावेळी जगन्नाथ पाटील नावाच्या व्यक्तीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरू असतानाच वार्तांकन करण्यासाठी काही पत्रकार आले होते. यावेळी एका मराठी वृत्तवाहिनीच्या एका पत्रकाराने हे वार्तांकन टिपण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. आपण पत्रकार आहोत आणि वार्तांकन करत आहोत हे सांगितलं आणि ओळखपत्र दाखवलं तरीही पोलिसांनी त्याला धक्काबुक्की केली आणि अरेरावीची भाषाही वापरली. त्यावेळी तो पत्रकार वारंवार सांगत होता की, मी पत्रकार आहे. मात्र पोलिसांनी काहीही ऐकून घेता त्याला ढकललं असं समजत आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/