दिग्विजय सिंगांच्या पराभवानंतर ‘जल’ समाधीची घोषणा करणारे मिर्ची बाबा ‘नजर’ कैदेत

भोपाळ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते दिग्वीजय सिंह यांच्या विजयासाठी मिरची यज्ञ केल्यामुळे चर्चेत आलेले वैराग्यनंद गिरी उर्फ मिरची बाबा निवडणुकीनंतर पुन्हा चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे उमेदवार दिग्वीजय सिंह यांचा पराभव झाल्यास जलसमाधी घेण्याची घोषणा केली होती. या निवडणुकीत दिग्वीजय सिंह यांचा पराभव झाल्याने मिरची बाबा जलसमाधी घेण्यासाठी भोपाळमध्ये आले आहेत. त्यांनी जलसमाधी घेऊ नये यासाठी पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवले आहे.

मिरची बाबाने भोपाळ येथील बडा तलावात जलसमाधी घेणार असल्याची घोषणा केली होती. जलसमाधी १६ जून रोजी दुपारी २ वाजून ११ मिनीटांनी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या घोषणेनंतर पोलिसांनी त्यांच्यावर वॉच ठेवला होता. तसेच भोपाळच्या जिल्हाधीकारी कुमार पिथोडे यांनी जलसमाधी घेण्यास परवानगी नाकारली आहे. बडा तलावाजवळ असलेल्या आश्रमाजवळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या जलसमाधीवर पोलिसांमुळे पाणी फिरले. त्यांनी आता २० जून रोजी जलसमाधी घेणार असल्याची घोषणा केली आहे.

मिरची बाबांनी या आगोदर १६ जून रोजी जलसमाधी घेणार असल्याचे जाहीर केल्याने रविवारी भोपाळ येथील बडा तलावाजवळ नागरिकांनी गर्दी केली होती. रविवारी मिरची बाबा भोपाळ मध्ये आल्यानंतर त्यांना पोलिसांनी हॉटेलमध्ये घेऊन गेले. जलसमाधीची वेळ निघून गेल्यानंतर मिरची बाबांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पोलिसांकडून आपल्याला खोडा घातला जात असल्याने आता २० जून रोजी जलसमाधी घेणार असल्याचे जाहिर केले.

सिनेजगत

‘या’ 5 बॉलिवूडच्या ‘टॉप’ अभिनेत्रींनी मृत्यूनंतर मागे सोडली कोटयावधीची संपत्‍ती

सलमान खानवर ‘फिदा’ असलेल्या ‘या’ साऊथच्या अभिनेत्रीला हवी सलमान बरोबर ‘भुमिका’

बॉलीवुडची ‘ही’अभिनेत्री बनली ‘Most Gorgeous Women’, म्हणजेचे नंबर 1

BigBoss Marathi-2 : मी किशोरी नाही, तिच्या आणि माझ्या नावातला फरक समजतो का? : रेणुका शहाणे

मलाइका-अर्जुन यांच्या नात्याबद्दल अरबाज खानने दिले मिडियाला ‘हे’ उत्तर

तृणमूलच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँच ‘ठरलं’ ; ‘या’ उद्योगपतीसोबत करणार विवाह

…म्हणून वैवाहिक जीवनात अभिनेता शाहिद कपूर आहे ‘सुखी’

‘या’ अभिनेत्याच लग्न होत, त्याच दिवशी वडिलांचं झालं होतं निधन