Police Suspended | सहकार्‍याच्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप, पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Police Suspended | सहकार्‍याच्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिस (Mumbai Police) दलातील एका कर्मचार्‍याला तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. अभिजीत परब असे निलंबन झालेल्याचे नाव आहे. या प्रकारामुळं वरळी पोलिस वसाहतीमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. (Police Suspended)

तक्रारदार पोलिस आणि अभिजीत परब हे एकाच परिसरात रहावयास आहेत. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वी एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये एक व्हिडीओ आला होता.
त्या ग्रुपमध्ये तक्रारदार होते.
सदरील व्हिडीओ आपल्याच पत्नीचा असून तो अभिजीत परबने शुट केल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांना
चांगलाच धक्का बसला. मात्र, सोशल मिडीयावर हा व्हिडीओ नेमका कोणी व्हायरल केला हे अद्याप स्पष्ट
झालेलं नाही असे पोलिसांनी सांगितले आहे.

प्रथमदर्शनी अभिजीत परब यांचा सदरील गुन्हयात सहभाग असल्याचे आढळून आलं.
त्यानंतर परब यांना निलंबीत करण्यात आले आहे. त्यांची विभागीय चौकशी देखील होणार आहे.
परब यांच्यावर वरळी पोलिस ठाण्यात (Worli Police Station) रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास वरळी पोलिस करीत आहेत.

Web Title :- Police Suspended | police constable suspended for making obscene video of colleagues wife FIR in Worli Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ मागणीला योगी आदित्यनाथ यांची तत्वत: मान्यता, दिले अयोध्या भेटीचे आमंत्रण

Uddhav Thackeray | नाशिकमधील ठाकरे गटाची गळती थांबविण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात…