एका नात्यात तीन पुरुष, जन्म दिला 2 मुलांना, 88 लाख रुपये झाले खर्च

नवी दिल्ली : अमेरिकेच्या तीन गे पुरुषांनी ’तीन पित्यांचे पहिले कुटुंब’ म्हणून इतिहास नाव नोंदले आहे. मात्र, यासाठी तीनही पुरुषांना मोठी कायदेशीर लढाई लढावी लागली. तीन गे पुरुषांनी दोन सरोगेट माता आणि एक एग डोनरच्या मदतीने एक मुलगा आणि एका मुलीला जन्माला घातले.

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये राहणार्‍या या तीन पित्यांची नावे आहेत, इआन जेनकिन्स, एलन मेफील्ड, जेरेमी एलेन हॉजेस. इआन जेनकिन्स व्यवसायाने डॉक्टर आहे. इआनने आता एक पुस्तक लिहिले आहे ज्यामध्ये मुलांना जन्माला घालणे आणि बर्थ सर्टिफिकेटमध्ये तीन पित्यांची नावे नोंदवण्यासाठी करण्यात आलेला संघर्ष सविस्तर सांगण्यात आला आहे. पुस्तकाचे नाव आहे – ’Three Dads and a Baby: Adventures in Modern Parenting.’ त्यांना अगोदर मुलांना जन्माला घालण्यासाठी मेडिकल प्रक्रिया आणि बर्थ सर्टिफिकेट मिळवण्याच्या कायदेशीर लढाईवर सुमारे 88 लाख रुपये खर्च करावे लागले.

मुलांना जन्माला घालण्यासाठी तीनही पित्यांना अगोदर तर मेडिकल प्रक्रियांवर खुप खर्च करावा लागला, यानंतर मुलांचे पालक म्हणून नाव नोंदण्यासाठी मोठी कायदेशीर लढाई लढावी लागली. अखेर तिघांना न्यायालयात विजय मिळाला. अमेरिकेच्या एका जजने तिघांच्या बाजूने निर्णय देताना म्हटले की, यांच्या मुलांच्या बर्थ सर्टिफिकेटवर पिता म्हणून तिनही पुरुषांची नावे नोंदली जावीत.