5 व्यांदा ‘प्रेमात’ अपयश आल्यानंतर 49 व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीने केला ‘साखरपुडा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जो जिता वही सिकंदर या चित्रपटातून समोर आलेली पूजा बेदी हिने 5 व्यांदा नात्यात अपयश आल्यानंतर आता पुन्हा एकदा साखरपुडा केला आहे. या चित्रपटानंतर ती लुटेरे, फिर तेरी कहानी याद आयी, शक्ती यांसारख्या अनेक मालिकांमध्ये दिसली. पूजा झलक दिखला जा, नच बलिये, बिग बॉस, फिअर फॅक्टर अशा रिॲलिटी शोमध्ये देखील होती.

एका वृत्तानुसार, पूजा आजवर पाच वेळा प्रेमात पडली आहे. पण आज ती सिंगल आहे. परंतू आता तिने फेब्रुवारी 2019 मध्ये शाळेपासूनचा मित्र असलेल्या मॅनेक कॉन्ट्रक्टरसह साखरपुडा केला आहे. आता ते लग्न करणार आहेत. ती आता 49 वर्षांची आहे.

पूजाने 1994 मध्ये फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले होते परंतू 12 वर्षांच्या संसारानंतर त्या दोघांचा घटस्फोट झाला . त्या दोघांना दोन मुल आहेत. तिची मुलगी आलिया बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे.

बॉलिवूडमध्ये पूजाने एंट्री केल्यानंतर पूजा आदित्य पांचोलीसोबत नात्यात होती. त्यावेळी आदित्यचे लग्न झालेले होते. पण तरीही ते दोघे नात्यात होते, परंतू आदित्यचे तिच्याच घरात कामवाल्याबाई बरोबर संबंध आहे हे पूजाला कळल्यावर तिने त्याच्यासोबत ब्रेकअप केले.

पूजा काही वर्षांपूर्वी नच बलिये या कार्यक्रमात हनिफ हिलाल या कोरिओग्राफर सोबत दिसली होती. परंतू काही वर्षातच ते वेगळे झाले. यशिवाय पूजा आणि द्वीती विक्रमादित्य अनेक महिने नात्यात होते. त्याच्यासोबत ती लग्न करणार होती, परंतू या नात्याला द्वीतीच्या कुटुंबियांचा विरोध असल्याने त्यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला.

बिग बॉसच्या घरात असताना पूजा अभिनेता आकाशदीप सेहगलच्या प्रेमात होती. आकाशने पूजाच्या नावाचा टॅटूदेखील हातावर काढला होता. ते दोघे लग्न करतील अशी शक्यता होती परंतू त्यांनी ब्रेकअप केले.

Visit : policenama.com