Pooja Chavan Case | संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला मारलं, 52 मिनिटांची सीडी समोर आणू; शिवसैनिकांनीच दिला इशारा

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shivsena Leader Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) अल्पमतात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार आले आहेत. माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे देखील बंडखोरी करुन एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यानंतर आता शिवसैनिकांनीच संजय राठोड यांच्या विरोधात पूजा चव्हाण प्रकरणातील (Pooja Chavan Case) पुरावे सादर करण्याची धमकी दिली आहे. पूजा चव्हाण (Pooja Chavan Case) या तरुणीच्या मृत्यूनंतर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Case) मंत्रीपदावरुन पाय उतार व्हावे लागलेल्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात (Cabinet) स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर संजय राठोड गुवाहाटीत दाखल झाले. त्यामुळे आजपर्यंत संजय राठोड यांचे समर्थन करणारे शिवसैनिक संतप्त झाले आहेत.

 

यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना आमदार (Shivsena MLA) संजय राठोड यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याने त्यांच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातले पुरावे समोर आणू,
या प्रकरणातली 56 मिनिटांची एक सीडी आपल्याकडे असून, बंजारा समाजाची मुलगी त्याने कशी मारली हे त्यातून उघड होईल,
असा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड (Rajendra Gaikwad) यांनी केला आहे.

पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीला मारुन संजय राठोड यांनी बंजारा समाजाची बेईमानी केली,
पूजा चव्हाण हिच्यावर कशा प्रकारे अत्याचार केले हे आम्हाला माहिती असून त्याचा पर्दाफाश करु,
असेही गायकवाड यांनी जाहीर भाषणात सांगितले.
तसेच राठोड यांच्या विरोधात बोलणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसणार असा प्रश्नही गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
राठोड यांनी गुवाहाटीवरुन मातोश्रीवर यावे आणि माफी मागावी अन्यथा त्यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही,
असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.

 

Web Title :- Pooja Chavan Case | Shivsena MLA sanjay rathore who killed pooja chavan bring a 52 minute cd shivsena workers warning

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा