बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोने पूजाचे फॅन्स झाले ‘घायाळ’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. पूजा तिच्या फॅन्ससाठी आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याबरोबरच आपल्या आगामी प्रोजेक्टबदलची माहितीही देत असते. तिने शेअर केलेले तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो कायम चर्चेत राहिले आहेत. अलीकडेच पूजाने तिचा ब्लॅक शर्टमधला बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीसोबतच पूजा सावंतने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत क्षणभर विश्रांती या सिनेमातून पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण तिने भूमिका साकारल्या आहेत. पूजाने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सध्या पूजा ‘महाराष्ट्राच्या बेस्ट डान्सर’मध्ये परिक्षकाची भूमिका साकारते आहे. मराठी रसिकांची मन जिंकल्यानंतर तिने बॉलिवूडमध्येही एंट्री केली आहे. तिथेही तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांची मने जिकली. पूजाने ‘जंगली’ सिनेमात शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती.