Pope Francis To Declare Devasahayam Pillai A Saint | देवसहायम पिल्लई यांना पोप फ्रान्सिस यांनी घोषित केले संत, ही उपाधी मिळवणारे ठरले पहिले भारतीय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Pope Francis To Declare Devasahayam Pillai A Saint | देवसहायम पिल्लई (Devasahayam Pillai) यांना पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांनी संत (Saint) घोषित केले आहे. हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. देवसहायम पिल्लई हे जन्माने हिंदू (Hindu) होते. 18 व्या शतकात त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. संत ही उपाधी मिळवणारे ते पहिले सामान्य भारतीय (1st Indian Layman) आहेत.

 

पोप फ्रान्सिस यांनी रविवारी व्हॅटिकनमधील सेंट पीटर्स बॅसिलिका येथील संतांच्या यादीत सहा जणांसह देवसहायम पिल्लई यांना संत म्हणून घोषित केले. चर्चने सांगितले की, पिल्लई यांनी संत बनण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

 

पिल्लई (Devasahayam Pillai) यांनी 1745 मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला. यानंतर त्याचे नाव लाजर ठेवण्यात आले. स्थानिक भाषेत लाजर किंवा देवसहायमचा अर्थ ’देव मदतीसाठी आहे’ असा होतो. (Pope Francis To Declare Devasahayam Pillai A Saint)

व्हॅटिकनने त्यांच्यासाठी तयार केलेल्या नोटमध्ये म्हटले आहे की, ख्रिस्ती धर्माचा प्रचार करताना देवसहायम यांनी जातीभेद विसरून समानता आणण्याचा आग्रह धरला.
यादरम्यान त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आणि 1749 मध्ये त्यांना अटक करण्यात आली.
वाढत्या अडचणी असूनही, त्यांनी आपले काम चालू ठेवले आणि 14 जानेवारी 1752 रोजी त्यांना गोळी मारण्यात आली.

 

तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील कोट्टरसोबत त्यांचे जीवन आणि शेवटच्या दिवसांचे क्षण जोडलेले आहेत.
त्यांच्या जन्मानंतर 300 वर्षांनंतर 2 डिसेंबर 2012 रोजी कोट्टरमध्ये देवसहायम यांन ’सौभाग्यशाली’ घोषित करण्यात आले.
त्यांचा जन्म 23 एप्रिल 1712 रोजी कन्याकुमारी जिल्ह्यातील नट्टालम येथे हिंदू नायर कुटुंबात झाला, जो तत्कालीन त्रावणकोर राज्याचा भाग होता.

 

Web Title :- Pope Francis To Declare Devasahayam Pillai A Saint | devasahayam pillai becomes 1st indian layman to be declared saint by pope francis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा