लिव्ह इनमध्ये सोबत राहत असलेले ‘हे’ कपल झाले विभक्त, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  बॉलिवूडमध्ये प्रत्येक दिवशी नाती बनतात आणि बिघडतात. इंडस्ट्रीचे मोठे स्टार असो अथवा सामान्य माणूस, कोणालाही रिलेशनशिपमध्ये असणे आणि ते नाते कोणत्याही इश्यूशिवाय मिळवणे मुश्किल असते. जेव्हा समस्या मोठ्या होतात, तेव्हा प्रत्येकजण त्यांच्याशी सामना करण्यास सक्षम नसतो आणि त्यामुळे संबंध संपुष्टात येतो.

बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत, ज्यांचे नाते चाहत्यांसाठी आदर्श असत होते. ज्यांनी एक पाऊल पुढे येऊन लिव्ह-इन मध्ये राहणे सुरु केले. दुर्भाग्य असे की, त्यांचे नाते जास्त काळ चालू शकले नाही आणि ते वेगळे झाले. आज आम्ही तुम्हाला अशाच कपलविषयी सांगणार आहोत,

रणवीर कपूर आणि कटरिना कैफ

चाहत्यांना ही जोडी आवडत होती. हे दोघे इबीजामध्ये एकत्र वेळ घालवताना दिसले, त्यानंतर त्यांचे संबंध उघड झाले. रणबीर आणि कटरिनाचे नाते सुरवातीपासूनच चर्चेत होते आणि दीपिका पदुकोणने या नात्याला तिच्या आणि रणबीरच्या ब्रेकपचे कारण सांगितले होते.

दोघे व्हेकेशननंतर लिव्ह इनमध्ये राहत होते आणि मानले जात होते की, दोघे लवकरच लग्न करतील. परंतू दोघांनी अचानक वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यांना आश्चर्यात टाकले. दोघे वेगळे का झाले? हे कोणाला माहित नाही. आता दोघे त्यांच्या आयुष्यात खूप पुढे गेले आहेत आणि दुष्मन होऊन पुन्हा चांगले मित्र झाले आहेत.

जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू

जॉन आणि बिपाशा यांच्या नात्याला अनेक लोक आदर्श मानत होते. हे दोघे त्या कपल्समधील होते ज्यांनी स्वतः समोर येऊन सांगितले होते की, दोघे सोबत राहत आहेत. दोघे त्यांच्या नात्याबध्दल मोकळेपणाने बोलत होते आणि या दोघांमध्ये असलेला रोमान्स मोठ्याप्रमाणात लोकांना पाहायला मिळत होता.

९ वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघे विभक्त झाले. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. दोघांचे नाते चांगल्या अटींवर संपले नाही. दोघांनी एकमेकांशी वाईट गोष्टी बोलल्या. आता जॉन आणि बिपाशा त्यांच्या जोडीदारासोबत खुश आहेत.

अंकिता लोकांडे आणि सुशांतसिंग राजपूत

अंकिता आणि सुशांतचे जवळपास ६ वर्षांचे रिलेशन होते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर दोघांना प्रेम झाले आणि काही काळानंतर ते दोघेही लिव्हिंमध्ये राहू लागले. पण कालांतराने सुशांत आणि अंकिताच्या नात्यात अडचणी आल्या त्यामुळे दोघे दूर गेले.

अभय देओल आणि प्रीती देसाई

अभय देओल बॉलिवूडच्या प्रसिद्ध देओल कुटुंबीयांतील आहेत पण त्यांची जीवनशैली त्यांच्या कुटुंबियातील इतरांपेक्षा वेगळी आहे. त्यांच्या कुटुंबात फक्त एक अभय आहेत ज्यांनी लिव्ह-इनमध्ये राहण्यासारखे मोठे पाऊल उचलले आहे. पण दुदैव इत्केकी, दोघे फक्त चार वर्ष एकत्र राहून वेगळे झाले.

लारा दत्ता आणि केली दोरजी

हे दोघे त्यांच्या मोडिलींगच्या दिवसांपासून एकत्र होते आणि जवळजवळ ८ वर्ष सोबत होते. मात्र इतके दिवस एकत्र असूनही दोघांचे संबंध संपुष्टात आले. यानंतर महेश भूपती लारा दत्त यांच्या आयुष्यात आले आणि आता ते तिच्यासोबत आनंदी आहेत.

विक्रम भट्ट आणि अमेषा पटेल

विक्रम आणि अमेषाचे पराक्रम फार काळ टिकले नाही. या छोट्या नात्यात दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता, जो असफल ठरला. काही काळाने दोघे वेगळे झाले.

अध्ययन सुमन आणि मायरा मिश्रा

मायर मिश्रा यांनी त्यांच्या ताज्या मुलाखतीत नोव्हेंबर २०२० मध्ये अध्ययन सुमनपासून विभक्त झाल्याचे उघड केले आहे. २०२० च्या लॉकडाऊनमध्ये दोघांनी आपलं नातं उघड केलं आणि ते एकत्र राहत असलयाचे सांगितले. मात्र, दोन वर्षांनी हे नातं संपलं आहे.

अध्ययन सुमनपासून विभक्त होण्याविषयी मायरा मिश्रा म्हणाली,”मी या नात्याबध्दल खूप गंभीर होते आणि मला वाटले की, हे नाते आता माझे सर्वकाही असेल, परंतू तसे झाले नाही.” आम्ही आपापसात बोलू शकलो नाही. मी एका वेगळ्या व्यक्तीच्या प्रेमात पडले. जेव्हा मी त्यांच्यासोबत राहत होते तेव्हा मला कळले की, ते खूप वेगळे आहेत.’