शेकडो ‘न्यूड’ फोटो, व्हिडीओसह ‘पॉर्न’ वेबसाइटचा 1.6 TB चा डेटा ‘लिक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॉर्न संबंधित सोशल मीडियावर एक मोठी घटना समोर आली. हजारो फिमेल पॉर्न स्टारच्या न्यूड सेल्फींसह पॉर्न व्हिडिओंचा डाटा लीक झाला आहे. ‘Only fans’ या वेबसाइटवरुन पॉर्न स्टार्सचा डेटा चोरुन काही हॅकर्सने तो सोशल मीडियावर शेअर केला.

हॅकर्सने या वेबसाइटला हँक करुन डॅनियला लॉयड, डॅनियला वेस्टब्रुक, बेक्स शाइनर आणि कॅटी सालमन यांच्यासारख्या अनेक फेमस पॉर्न स्टार न्यूड सेल्फी आणि व्हिडिओचा डाटा इंटरनेटवर शेअर केला आहे. यूजर्सला असे पॉर्न व्हिडिओ पाहण्यासाठी इंटरनेटवर वेबसाइटला पैसे द्यावे लागतात. परंतु आता हा डाटा इंटरनेटवर व्हायरल केला गेला आहे.

हॅकिंगचा दावा फेटाळला –
हा डाटा सोशल मीडियावर शेअर झाल्याच्या बातम्या वेगाने पसरल्या आहेत. वेबसाइटच्या चाहत्यांना आणि पॉर्न स्टारला हा हॅकिंगचा प्रकार असल्याचे वाटत आहे. परंतू Only fans या वेबसाइटने हा दावा फेटाळला आहे. वेबसाइटचे अधिकारी स्टिव्ह पिम यांनी ट्विट केले आहे की युजर्सने या वेबसाइट वरुन जास्तीत जास्त डेटा डाउनलोड केला आहे. त्यांनी हा डेटा इंटरनेटवर शेअरही केला आहे. त्यामुळे या पॅार्न स्टार्सचे व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर पाहणं मोफत उपलब्ध झाले आहे. वेबसाइट हॅक झाले होती का याची आम्ही शहानिशा केली आहे. वेबसाइट सुरक्षित आहे.

स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर जबाबदार –
वेबसाइटसंबंधित एका पॉर्न स्टारने दावा केला आहे की, स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअरचा वापर करुन हा डेटा लीक केला गेला आहे. या सॉफ्टवेअर द्वारे यूजर कंप्यूटर स्क्रीनवरील डेटा लोकल ड्रायव्हमध्ये सेव्ह करुन इंटरनेटवर शेअर करु शकतो.

तब्बल 800 हॉलिवूड सिनेमे बनतील एवढा डाटा लीक –
आठवड्याच्या सुरुवातीपासून इतर वेबसाइट्सवर Only fans या वेबसाइटचा डेटा असलेल्या लिंक दिसत होत्या. या वेबसाइटच्या चोरलेल्या पॉर्न डेटाची साइज 1.6 टीबी एवढी होती. या साइजमध्ये हॉलिवूडचे एचडी असे एकूण 800 सिनेमे मावू शकतील.

जगभरात तीन कोटी यूजर्स –
‘only fans’ ही वेबसाइट पॉर्न डेटा पुरवते. या वेबसाइटचे जगभरात एकूण 3 कोटी यूजर्स आहेत. या वेबसाइटवरील पॉर्न स्टार्सचा व्हिडिओ किंवा फोटो पाहायचा झाल्यास यूजर्सला पैसे मोजून सब्सक्रिप्शन घ्यावे लागते.