Pornography Case | केवळ वासना नव्हे सेक्स, प्रेमसुद्धा आहे, पोर्नोग्राफी केसमध्ये केरळ हायकोर्टाची टिप्पणी

नवी दिल्ली : Pornography Case | पोर्नोग्राफी पाहण्यासंबंधित खटल्याच्या सुनावणीदरम्यान केरळ उच्च न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण टिपण्णी केल्या. यामध्ये सेक्स, अश्लील व्हिडिओ आणि घरात बनवलेले अन्न यासारख्या मुद्द्यांचा समावेश होता. एक अशी केस हायकोर्टात पोहोचली होती, ज्यामध्ये एका व्यक्तीवर रस्त्याच्या कडेला अश्लील व्हिडिओ पाहण्याचा आरोप करण्यात आला होता. (Pornography Case)

कोर्टाने म्हटले की, इतर कोणालाही न दाखवता खाजगीत पोर्नोग्राफी पाहणे हा गुन्हा नाही.

न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हीकृष्णन या खटल्याची सुनावणी करत होते. पोर्नोग्राफी पाहणे हा नागरिकाचा वैयक्तिक निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. कोर्टाने असेही म्हटले की, यामध्ये ढवळाढवळ करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्यासारखे होईल. कोर्टाने त्या व्यक्तीविरुद्ध कलम २९२ अन्वये असलेला खटला रद्द केला. याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते की, आपल्यावरील आरोप खरे मानले तरी त्याला कलम २९२ नुसार गुन्हा म्हणता येणार नाही. (Pornography Case)

कोर्टाने सेक्सबाबत काय म्हटले?
बार अँड बेंचनुसार, कोर्टाने सेक्सबाबत म्हटले की, ही केवळ वासना नसून प्रेमाची अभिव्यक्ती आहे. ते संततीसाठी सुद्धा केले जाते. कोर्टाने म्हटले, परंतु लैंगिकता काहीशी अशी गोष्ट आहे जी देवाने विवाहित स्त्री-पुरुषांसाठी डिझाईन केली आहे. ती केवळ वासना नव्हे तर प्रेमाची गोष्ट आणि संतती निर्माण करण्यासाठी देखील आहे. परंतु प्रौढ झालेल्या पुरुष आणि स्त्रीने सहमतीने लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा नाही.

पोर्नोग्राफीवर दिला सल्ला
यावेळी न्यायालयाने अल्पवयीन मुलांच्या हातात मोबाईल देण्याच्या नुकसानीबाबत सुद्धा चर्चा केली. न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणापासून वेगळे होण्यापूर्वी मी आपल्या देशातील अल्पवयीन मुलांच्या पालकांना काही आठवण करून देऊ इच्छितो. पोर्नोग्राफी पाहणे हा गुन्हा नसू शकतो, पण लहान मुले पॉर्न व्हिडीओ पाहू लागली तर त्याचा मोठा परिणाम होईल. कोर्ट म्हणाले की पोर्नोग्राफी शतकानुशतके चालत आलेली आहे.

आणखी एक सल्ला
न्यायालयाने म्हटले की, मुलांना त्यांच्या मोकळ्या वेळेत क्रिकेट, फुटबॉल किंवा इतर खेळ खेळू द्या.
भविष्यात देशाच्या आशेचा किरण ठरणाऱ्या निरोगी तरुण पिढीसाठी हे आवश्यक आहे.
स्विगी आणि झोमॅटोद्वारे रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ मागवण्याऐवजी, मुलांना त्यांच्या आईच्या हातच्या स्वादिष्ट
अन्नाचा आनंद घेऊ द्या. मुलांना मैदानात खेळू द्या आणि घरी आल्यावर आईच्या हातच्या अन्नाचा अस्वाद घेऊ द्या.
मी हे लहान मुलांच्या पालकांच्या शहाणपणावर सोडतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘India’ Coordination Committee Meeting | शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ‘इंडिया’ च्या समन्वय समिती पहिली बैठक आज, अनेक मुद्द्यांवर चर्चेची शक्यता