Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांकडून पुन्हा नव्या कलमांची वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शे गाडीने धडक दिल्याने अभियंता असलेल्या दोन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला (Kalyani Nagar Accident). या प्रकरणात पोलिसांनी कलम ३०४ अ दाखल केला होता. पोलिसांनी कोर्टात आरोपीला उभे केल्यांनतर एक दिवसांच्या आत या संबंधित प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला होता.(Porsche Car Accident Pune)

विविध स्तरातून रोष व्यक्त झाल्यांनतर पोलिसांनी कलम ३०४ या कलमाची वाढ करून पुन्हा त्याला कोर्टासमोर सादर केले असता कोर्टाने त्याला १४ दिवस बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश दिले.

आता पोलिसांनी आणखी काही कलमांची नोंद वाढवली आहे. हे वाढवलेले गुन्हे अल्पवयीन मुलाचे वडील, पब मालक आणि व्यवस्थापक यांच्याविरोधात दाखल करण्यात आले आहेत.

पुणे पोलिसांनी नव्याने दाखल केलेल्या कलमांमध्ये भादंवि कलम ४२० चा समावेश केला आहे.
तसेच कलम ६५ ई आणि कलम १८ यांचा समावेश केला आहे.

यातील कलम ४२० हे फसवणुकीशी संबंधित आहे , कलम ६५ ई हे दंड आणि शिक्षा याशी निगडित आहे तर कलम १८
हे दहशतवादी कृत्य अथवा त्याला पाठिंबा देणे यासाठी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IMD on Mumbai Monsoon | मोसमी पाऊस मुंबईत कधी धडकणार? मुंबईकर उकाड्याने हैराण, हवामान विभाग काय सांगतो!

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी