Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन धनिकपुत्राची रवानगी बालसुधारगृहात, कसा असतो दिनक्रम?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Porsche Car Accident Pune | पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला. त्यामुळे त्याला 14 दिवस बालसुधारगृहात राहावं लागणार आहे (Observation Home). दारु पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन मुलाने दोघांचा जीव घतेला. त्यानंतर त्याला काही तासात जामीन मंजूर झाला. मात्र, यावरून सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. अखेर बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द करुन त्याला 14 दिवस बाल सुधारगृहात ठेवण्याचा निर्णय बाल न्याय हक्क मंडळाने (Juvenile Justice Board -JJB) दिला. (Kalyani Nagar Accident Pune)

बाल न्याय हक्क मंडळाच्या निर्णयामुळे धनिकपुत्राला पुढील 14 दिवस बालसुधारगृहात काढवे लागणार आहेत. तसेच तेथील नियम त्याला पाळावे लागणार आहे. तर दुसरीकडे अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल याला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे विशाल अग्रवाल (Vishal Agarwal Arrest) याची रवानगी येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerawada Police Station) पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

बाल सुधारगृहात अल्पवयीन आरोपीचा दिनक्रम कसा असणार आहे…

  • सकाळी 8.10 वाजता नाश्त्यासाठी पोहे, अंडी, दूध, उपमा देण्यात येईल
  • 11 वाजता प्रार्थनेची वेळ असणार आहे
  • 11.30 ते 1 यादरम्यान इंग्रजीसह इत विषयांच्या शिकवण्या असणार आहेत
  • 1 ते 1.30 दुपारच्या जेवणाची वेळ असणार आहे.
  • 1.30 ते दुपारी 4 डॉर्मेटरीमध्ये आराम करता येणार आहे
  • 4 वाजता दुपारचा नाश्ता दिला जाणार आहे
  • 4.30 ते 5 टीव्ही पाहण्यासाठी वेळ दिला जाणार आहे
  • 5 ते सायंकाळी 7 फुटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळण्यासाठी सुट्टी असणार आहे
  • रात्री 7 ते 8 रात्रीचे जेवण. जेवणामध्ये पालेभाज्या, चपाती, वरण-भात दिला जाणार आहे.
  • रात्री 8 वाजता झोपण्याची वेळ असणार आहे

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ujani Dam Backwater Boat Accident | उजनी जलाशय बोट दुर्घटनेतील बेपत्ता 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले, कुटुंबियांचा आक्रोश

Pune Crime Branch | पुणे : गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक, दोन पिस्टल व चार राऊंड जप्त