Pune Crime Branch | पुणे : गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक, दोन पिस्टल व चार राऊंड जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch | सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि चार राऊंड असा एकूण एक लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे (Pistol Seized). ही कारवाई सोमवारी (दि.20) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास डीपी रोड येथील बोगन व्हिला फार्मच्या मोकळ्या मैदानात केली.(Pune Crime Branch)

रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय-27 रा. दारुवाला पुल, सोमवार पेठ, पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे
नाव आहे. युनिट तीनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी अंलकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते.
त्यावेळी सराईत गुन्हेगार दुध्या चव्हाण बोगन व्हिला फार्मच्या मोकळ्या मैदानातील झाडाखाली थांबला असून
त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली घेऊन दोन देशी बनावटीचे दोन पिस्टल आणि चार राऊंड व एक मोपेड असा एकूण 1 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी, पिस्टल बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार होता.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे,
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस अंमलदार सुनिल पवार, संतोष क्षीरसागर, शरद वाकसे, पांडूरंग कामतकर,
किरण पवार, संजीव कळंबे, सुजीत पवार, राकेश टेकावडे, सतीश कत्राळे, सोनम नेवसे, कानिफनाथ कारखेले,
गणेश शिंदे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीविरोधात महाराष्ट्र परिवहन विभागाचा मोठा निर्णय, ‘या’ वर्षांपर्यंत परवाना बंद

Murlidhar Mohol On Ravindra Dhangekar | पुणे पोर्शे अपघातप्रकरणी रवींद्र धंगेकरांचे फडणवीस आणि पोलिसांवर आरोप; मोहोळांनी दिले प्रत्युत्तर, ”पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखतात”

Porsche Car Accident Pune | आरोपी नातवाची कोर्टात गॅरंटी देणाऱ्या आजोबांचे अंडरवर्ल्डशी लागेबांधे, शिंदे गटाच्या नेत्याची धक्कादायक माहिती, संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल