अरुणाचल, आसामच्या काही भागात पूरस्थितीची शक्यता, सतर्कतेचा इशारा

गुवाहाटी : वृत्तसंस्था

पूरपरिस्थितीची शक्यता असल्याने अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील ब्रह्मपुत्र नदीच्या परिसरात पूराचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी चीनने ९०२० क्यूबिक पाणी सँगपो नदीत सोडले होते. अरुणाचल प्रदेशातील सियांग नदीच्या पात्रातील पाणी पातळीत विलक्षण वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोग (सीडब्ल्यूसी) ने दिली आहे.

[amazon_link asins=’B01LZPUP1O,B0002E3MP4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’965571bc-acda-11e8-b12d-0984b7e62987′]

कोणत्याही परिस्थितीत मासेमारी, पोहणे आणि इतर उपक्रमांकरीता सियांग नदीतील प्रवेश बंद करण्यात आला आहे. झारकू, पगळेक, एसएस मिशन, जर्कोंग, बन्सकोटा, बर्गुंग, सिगार, बोरगुली, सेराम, कोंगकुल, नॅमिंग, मेर यांसारख्या कमी निचरा असलेल्या परिसरातील लोकांना सतर्क राहण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या सुचनांच्या पाश्र्वभूमीवर दिब्रुगढ जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात पुरेसे सावधगिरीचे उपाय केले आहेत.