Post office franchise | फक्त 5 हजारात घेऊ शकता पोस्ट ऑफिसची फ्रेंचायजी, पहिल्या दिवसापासून मोठी कमाई; जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Post office franchise | जर तुम्ही कमी गुंतवणुकीत बिझनेस (How to start my own business) करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. देशात 1.55 लाख पोस्ट ऑफिस असूनही अनेक भाग असे आहेत जिथे पोस्ट ऑफिस (Post office franchise) नाहीत. तेथील गरज पाहता पोस्टल डिपार्टमेंट इंडिया पोस्ट (India Post) ऑफिस फ्रेंचायजी उघडणे (How to open Post office franchise?) आणि कमाई (Earn money) करण्याची संधी देते.

 

यासाठी अवघे 5000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट करावे लागेल. फ्रेंचायजीद्वारे स्टँप, स्टेशनरी, स्पीड पोस्ट आर्टिकल्स, मनी ऑर्डर बुकिंगची सुविधा मिळेल आणि याच सुविधा एका ठराविक कमीशनसह फ्रेंचायजी घेणार्‍याचे रेग्युलर इन्कमचे माध्यम होतील.

 

कोण घेऊ शकतात फ्रेंचायजी –

 

कुणीही व्यक्ती, इन्स्टीट्यूशन, ऑर्गनायजेशन किंवा इतर अँटिटीज जसे कॉर्नर शॉप, पानवाले, किराणावाले, स्टेशनरी शॉप, स्मॉल शॉपकिपर इत्यादी पोस्ट ऑफिस फ्रेंचायजी घेऊ शकतात.
याशिवाय नवीन सुरूहोणारे शहरी टाऊनशीप, स्पेशल इकॉनॉमिक झोन, नवीन सुरू होणारे इंडस्ट्रियल सेंटर, कॉलेज, पॉलिटेक्निक्स, युनिव्हर्सिटीज, प्रोफेशनल कॉलेज इत्यादी सुद्धा फ्रेंचायजीचे (Post office franchise) काम घेऊ शकतात.

 

फ्रेंचायजी घेण्यासाठी फॉर्म सबमिट करावा लागेल. सिलेक्ट झालेल्या लोकांना डिपार्टमेंटसह MoU साइन करावे लागेल.
फ्रेंचायजी घेण्यासाठी इंडिया पोस्टने मिनिमम क्वालिफिकेशन 8वी पास ठरवले आहे. व्यक्तीचे वय किमान 18 वर्ष असावे.

 

कसे होते सिलेक्शन –

 

फ्रेंचायजी (Post office franchise) घेणार्‍याचे सिलेक्शन संबंधित डिव्हिजनल हेडद्वारे केले जाते.
जे अर्ज मिळाल्यानंतर 14 दिवसांच्या आत ASP /SDl च्या रिपोर्टवर आधारित असते.
फ्रेंचायजी उघडण्याची परवानगी अशा ठिकाणी मिळत नाही जिथे पंचायत संचार सेवा योजना स्कीम अंतर्गत पंचायत संचार सेवा केंद्र आहे.

 

कोण घेऊ शकत नाही फ्रेंचायजी –

 

पोस्ट ऑफिस एम्प्लॉईजच्या कुटुंबातील सदस्य त्याच विभागात फ्रेंचायजी घेऊ (Post office franchise) शकत नाहीत जिथे तो एम्प्लॉई काम करत आहे.
कुटुंबाच्या सदस्यांमध्ये कर्मचार्‍याची पत्नी सख्खे आणि सावत्र लोक जे पोस्टल कर्मचार्‍यावर अवलंबून आहेत किंवा सोबत राहतात ते फ्रेंचायजी घेऊ शकत नाहीत.

 

मिळतील या सर्व्हिस आणि प्रॉडक्ट –

 

  • स्टँप आणि स्टेशनरी, रजिस्टर्ड आर्टिकल्स, स्पीड पोस्ट आर्टिकल्स, मनी ऑर्डरची बुकिंग. मात्र 100 रुपयांपेक्षा कमीची मनी ऑर्डर बुब होणार नाही.
  • सोबत यासंबधी आफ्टर सेल सर्व्हिस जसे की प्रीमियमचे कलेक्शन, बिल/टॅक्स/दंडाचे कलेक्शन आणि पेमेंट सारख्या रिटेल सर्व्हिस, ई-गव्हर्नन्स आणि सिटीजन सेंट्रिक सर्व्हिस, अशा प्रॉडक्टचे मार्केटिंग, ज्यासाठी डिपार्टमेंटने कार्पोरेट एजन्सी हायर केली असेल किंवा टाय-अप केले असेल.
  • सोबतच याच्याशी संबंधीत सेवा, भविष्यात डिपार्टमेंटद्वारे सादर केल्या जाणार्‍या सर्व्हिस.

 

अशी होईल कमाई –

 

फ्रेंचायजीची कमाई त्यांच्याद्वारे देण्यात येणार्‍या पोस्टल सर्व्हिसेसवर मिळणार्‍या कमिशनद्वारे होते. हे कमीशन MOU मध्ये ठरलेले असते.
रजिस्टर्ड आर्टिकल्सच्या बुकिंगवर 3 रुपये, स्पीड पोस्ट आर्टिकल्सच्या बुकिंगवर 5 रुपये, 100 ते 200 रुपयांच्या
मनी ऑर्डरच्या बुकिंगवर 3.50 रुपये, 200 रुपयांपेक्षा जास्त मनी ऑर्डरवर 5 रुपये कमिशन मिळते

 

तसेच दरमहिना रजिस्ट्री आणि स्पीड पोस्टचे 1000 पेक्षा जास्त आर्टिकल्सच्या बुकिंगवर 20 टक्के अतिरिक्त कमीशन, पोस्टेज स्टँप,
पोस्टल स्टेशनरी आणि मनी ऑर्डर फॉर्मच्या विक्रीवर सेल अमाऊंटच्या 5 टक्के रेव्हेन्यू स्टँप, सेंट्रल रिक्रूटमेंट फी स्टँप्स इत्यादीच्या
विक्रीसह रिटेल सर्व्हिसेसवर पोस्टल डिपार्टमेंटला झालेल्या कमाईच्या 40 टक्के.

 

Web Title : Post office franchise | how to take post office franchise you can start just in 5k investment and earn lakh of rupees check process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात घरगुती वादातून पत्नी आणि सासूवर कोयत्याने सपासप वार

Best healthy food for kids | मुलांना ताकदवान बनवायचे असेल तर खाऊ घाला ‘हे’ 6 पदार्थ, आजार राहतील दूर, जाणून फायदे

SIP Mutual Fund | ‘एसआयपी’मध्ये करा गुंतवणूक ! कमी काळात होऊ शकता रू. 10.19 कोटीचे मालक, जाणून घ्या कसे?