SIP Mutual Fund | ‘एसआयपी’मध्ये करा गुंतवणूक ! कमी काळात होऊ शकता रू. 10.19 कोटीचे मालक, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SIP Mutual Fund | जर तुम्ही गुंतवणुकीची योजना (Investment planning) बनवत असाल तर तुमच्यासाठी SIP चांगला पर्याय होऊ शकतो. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट (Systematic Investment Plan) प्लान उर्फ म्युच्युअल फंड एसआयपी (SIP Mutual Fund). SIP कमाई करणार्‍या व्यक्तींसाठी सर्वात आकर्षक पर्यायांपैकी एक आहे.

 

 

म्युच्युअल फंड (Mutual fund) गुंतवणुकीची सर्वात शानदार योजना मानली जाते. याद्वारे गुंतवणुकदार दरमहिना एक छोटी रक्कम जमा करून मोठ्या कालावधीसाठी मोठी रक्कम तयार करतो.

 

कसा तयार करावा कोटींचा फंड (How to create a crore fund)

50 वर्षाच्या वयात 10 कोटी मिळवणे एक महत्वाकांक्षी लक्ष्य आहे आणि यासाठी गुंतवणुकदाराला 25 वर्षाच्या वयात जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर गुंतवणूक सुरू केली पाहिजे. (SIP Mutual Fund)

 

एकरकमी रक्कम नसल्याने म्युच्युअल फंड एसआयपी निवडण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. तसेच स्टेप-अप एसआयपी गुंतवणूक कायम ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

 

मात्र, 50 वर्षाच्या वयात हे अत्यंत महत्वाकांक्षी 10 कोटीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकदाराला सल्ला दिला जातो की, पारंपरिक 10 टक्के वार्षिक स्टेप-अप ऐवजी मासिक एसआयपीमध्ये 15 टक्के वार्षिक स्टेप-अपचे पालन करा. एक्सपर्टनुसार, गुंतवणुकदाराने इक्विटी म्युच्युअल फंड निवडला पाहिजे कारण यामुळे त्यांना गुंतवणुकीच्या कालावधीत किमान 12 टक्के रिटर्न मिळण्यास मदत होईल. (SIP Mutual Fund)

 

जाणून घ्या काय आहे कॅलक्युलेशन?

25 वर्षासाठी मासिक एसआयपीवर 12 टक्के रिटर्न मानून, म्युच्युअल फंड कॅलक्युलेटर सल्ला देतो की,
50 वर्षाच्या वयात आपले 10 कोटीचे गुंतवणूक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी 15 टक्के वार्षिक-स्टेप आप
रणनितीसह 15,000 मासिक एसआयपीसह सुरुवात करावी लागेल.

 

जर गुंतवणुकदाराने वर नमूद म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूक रणनितीचे पालन केले तर म्युच्युअल फंड एसआयपी कॅलक्युलेटरनुसार,
50 वर्षाच्या वयात मॅच्युरिटी रक्कम 10.19 कोटी मिळेल.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- SIP Mutual Fund | invest in sip mutual fund and earn 10 19 crore rupees check how details here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा