Post Office देतेय 60 हजार रुपये मिळवण्याची संधी, 1000 रुपयांनी उघडा ‘हे’ खाते
नवी दिल्ली : जर तुम्ही गुंतवणुकीचा एखादा असा पर्याय शोधत असाल ज्यामध्ये दरमहिना इन्कमची गॅरंटी असेल तर पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम अकाऊंट (POMIS) चांगली योजना आहे. विवाहितांना या स्कीममध्ये दुप्पट लाभ मिळतो. सिंगल गुंतवणुकदारांना दर महिना किमान 2475 रुपये किंवा 29,700 रुपये वार्षिक इन्कमची गॅरंटी मिळते, तर जॉईंट अकाऊंटमध्ये हा लाभ दुप्पट होतो.
पीओएमआयएस अकाऊंटमध्ये जर सिंगल अकाऊंट उघडले तर एकरकमी 4.5 लाख रुपये जमा करावे लागतात. तर, जॉईंट अकाऊंटद्वारे कमाल 9 लाख रुपये जमा करू शकता. यामध्ये 6.6 टक्के वार्षिक व्याजाच्या हिशेबाने जी रक्कम संपूर्ण वर्षात तयार होते, ती 12 महिन्यात विभागली जाते. प्रत्येक महिन्यांची रक्कम तुमचे मंथली इन्कम असते. स्कीमची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे, परंतु पुढे रिइन्व्हेस्टमेंट अंतर्गत 5-5 वर्षांसाठी ती वाढवता येते.
कसे उघडायचे एमआयएस अकाऊंट
आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही एमआयएस अकाऊंट उघडू शकता. एमओएमआयएसचा फार्म भरताना ओळखपत्र, रेसिडेन्शियल प्रूफ, 2 पासपोर्ट साईज फोटोची आवश्यकता असते. फॉर्म भरतेवेळी तुम्हाला एक साक्षीदार द्यावा लागेल. फॉर्मासोबत अकाऊंट उघडण्यासाठी ठरलेल्या रक्कमेसाठी रोकड किंवा कॅश जमा करा.
किती मिळते व्याज
* पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (एमओएमआयएस) मध्ये 6.6 टक्के वार्षिक व्याज मिळते.
* खाते उघडण्याच्या तारीखेपासून एक महिना पूर्ण झाल्यानंतर आणि मॅच्युरिटी सुद्धा देय असेल.
* जर खातेधारक प्रत्येक महिन्याला देय व्याज घेत नसेल तर अशाप्रकारच्या व्याजावर कोणतेही अतिरिक्त व्याज मिळणार नाही.
* खातेदाराने जमा केलेल्या इतर अतिरिक्त जमाच्या प्रकरणात अतिरिक्त जमा परत केली जाईल आणि केवळ पीओ बचत खाते व्याज, खाते उघडण्याच्या तारखेपासून परतीच्या तारखेपासून लागू होईल.
* व्याज एकाच पोस्ट ऑफिसमध्ये बचत खात्यात ऑटो क्रेडिटच्या माध्यमातून किंवा ईसीएसने काढता येऊ शकते.
* जमाकर्त्याला मिळणारे व्याज टॅक्सेबल आहे.
प्री-मॅच्युअर खाते बंद करण्याचे नियम
* जमाच्या तारखेपासून 1 वर्ष संपण्यापूर्वी कुणीही जमा रक्कम परत घेऊ शकत नाही.
* जर खाते उघडल्यानंतर 1 वर्षाच्या अगोदर आणि 3 वर्षापूर्वी खाते बंद केले तर मुळ रक्कमेमधून 2% च्या बरोबरीने कपात केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल.
* जर खाते उघडल्याच्या तारखेपासून तीन वर्षानंतर आणि 5 वर्षांच्या अगोदर खाते बंद केले तर मुळ रक्कमेतून 1% एवढी कपात केली जाईल आणि शिल्लक रक्कम दिली जाईल.
* संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पास बुकसह विहित नमुण्यात अर्ज देऊन वेळेपूर्वी खाते बंद करता येऊ शकते.
प्रत्येक वर्षी मिळतील 60 हजार रुपये
सिंगल अकाऊंटच्या द्वारे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये किमान 4.5 लाख रुपये जमा करता येतात. 6.6 टक्के वार्षिक व्याजदराच्या हिशेबाने या रक्कमेवर एकुण व्याज 29,700 रुपये होईल. तर, या स्कीममध्ये जॉईंट अकाऊंटद्वारे 9 लाख रुपये कमाल जमा करता येऊ शकतात. व्याजदराच्या हिशेबाने या रक्कमेवर एकुण व्याज 59,400 रुपये होईल.