Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा दरमहिना 100 रुपयांची गुंतवणूक, होईल लाखोचा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Post Office Scheme | तुम्हाला जास्त गुंतवणूक करता येत नसेल तर 100 रुपये दरमहिना पोस्ट ऑफिसच्या एका योजनेत गुंतवणूक करू शकता. यात तुम्हाला लाखोचा फायदा होऊ शकतो. शिवाय योजनेत कर्जाचा लाभ घेऊ (Post Office Scheme) शकता.

या योजनेसाठी कोण आहे पात्र

Post Office ची ही योजना एक RD प्रक्रिया आहे. ज्या अंतर्गत वैयक्तिक, संयुक्त खाते (3 लोकांपर्यंत), अल्पवयीनकडून एक पालक, तसेच 10 वर्षावरील अल्पवयीन सुद्धा या योजनेत खाते उघडू शकतो.
या अंतर्गत कितीही खाती उघडू शकता. (Post Office Scheme)

पैसे जमा करण्याची प्रक्रिया

या योजनेत दरमहिना किमान 100 रुपये प्रत्येक खात्यात जमा करावे लागतात.
15 तारखेला खाते उघडले तर उघडल्यानंतरच्या महिन्याच्या 15 व्या दिवसापर्यंत पैसे जमा करता येतात.

याशिवाय जर खाते एका कॅलेंडर महिन्याच्या 16 व्या दिवशी आणि शेवटच्या कामाच्या दिवसादरम्यान उघडले तर नंतरच्या महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवसापर्यंत पैसे जमा करता येतील.
सोबत जर आरडी खाते बंद केले नाही तर, एखाद्या खात्यात 5 वर्षापर्यंत अगाऊ जमा करता येऊ शकते.

कर्ज घेण्याची ही आहे तरतुद

12 हप्ते जमा केले आणि खाते 1 वर्षापर्यंत सुरू ठेवल्यानंतर शिल्लक रक्कमेच्या 50% पर्यंत कर्ज सुविधा मिळू शकते.
कर्ज एकरकमी किंवा समान मासिक हप्त्यात फेडता येऊ शकते.

तर खात्यातून कर्जाची रक्कम कापली जाते

कर्जावर व्याज आरडी खात्यावर लागू व्याजदर +2% च्या दराच्या रूपात लागू होईल. या व्याजाची गणना पैसे भरल्याच्या तारखेपासून परतफेड जमा तारखेपर्यंत केली जाईल.
जर कर्ज फेडले नाही तर खात्यातून कर्जाची रक्कम कापली जाते. कर्ज घेण्यासाठी संबंधित पोस्ट ऑफिसशी संपर्क करावा.

 

5 वर्षापर्यंत जमा करावी लागते रक्कम

या योजनेत पाच वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतात. परंतु तुमची इच्छा असेल तर अर्ज करून पुढेही पैसे 5 जमा करू शकता.
विस्तर केल्यानंतर सुद्धा जुनाच व्याजदर असेल. पूर्ण वर्षासाठी, आरडी व्याजदर लागू असेल आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी, पीओ बचत खाते व्याजदर लागू होईल.

इतका मिळू शकतो लाभ

तुम्ही दर महिना पोस्टाच्या आरडीमध्ये 5000 रुपयांची गुंतवणूक 5 वर्षासाठी केली तर मॅच्युरिटीवर 3.48 लाख रुपये मिळतात.
पोस्टाच्या RD वर सध्या 5.8 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. व्याजाचे कम्पाऊंडिंग तिमाही आधारावर केले जाते.

 

Web Title : Post Office Scheme | post office scheme invest rs 100 every month in this post office scheme you will get the benefit of lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bloomberg Billionaires Index | Elon Musk, Jeff bezos, Bill Gates यांच्या 100 अरब डॉलरच्या क्लबमध्ये सहभागी झाले मुकेश अंबानी

Datsun Go | झीरो डाऊन पेमेंटवर 2.1 लाखात खरेदी करा Datsun Go, कंपनी देईल मनी बॅक गॅरंटीसह वॉरंटी प्लान; जाणून घ्या

Mumbai Police Cyber Cell | मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून CBI चे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना ‘समन्स’