Bloomberg Billionaires Index | Elon Musk, Jeff bezos, Bill Gates यांच्या 100 अरब डॉलरच्या क्लबमध्ये सहभागी झाले मुकेश अंबानी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Bloomberg Billionaires Index नुसार, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आता जेफ बेजोस, एलन मस्क, मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स (Jeff Bezos, Alan Musk, Mark Zuckerberg and Bill Gates) यांच्यासह जगाच्या त्या एलीट वेल्थ क्लब (elite wealth club) मध्ये सहभागी झाले आहेत, ज्यांच्याकडे किमान 100 बिलियन डॉलरची संपत्ती आहे. आता ते जगातील 11 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे 100 अरब डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती आहे. (Bloomberg Billionaires Index)

अंबानी यांच्या अगोदर वॉरेन बफे 10 व्या स्थानावर आहेत तर एलन मस्क यांची संपत्ती 222 अरब डॉलरवर पोहचली आहे. जगातील कोणत्याही व्यक्तीकडे इतकी संपत्ती कधीही नव्हती. यावर्षी एलन मस्क यांच्या संपत्तीमध्ये 50 अरब डॉलरपेक्षा जास्त वाढ दिसून आली. तर मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये 23 बिलियन डॉलरची वाढ दिसून आली आहे.

जाणून घ्या कोणत्या अरबपतीकडे किती संपत्ती

अरबपतीचे नाव / एकुण संपत्ती / यावर्षीची वाढ (आकडे बिलियन डॉलरमध्ये)

एलन मस्क 222 52.4

जेफ बेजोस 191 0.549

बर्नार्ड अरनॉल्ट 156 41.2

बिल गेट्स 128 -3.81

लॅरी पेज 125 42.1

मार्क झुकरबर्ग 123 19.5

सर्जी ब्रिन 120 40.3

लॅरी एलिसन 108 28.6

स्टीव्ह बॉल्मर 106 25.3

वॉरेन बफे 103 15.7

मुकेश अंबानी 101 23.8

 

Web Title : Bloomberg Billionaires Index | bloomberg billionaires index mukesh ambani join elon musk jeff bezos bill gatess usd 100 billion club

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 2,446 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | अटकेनंतर छाती दुखीची तक्रार ! पुणे सीआयडीनं अ‍ॅड. सागर सुर्यवंशीला केलं ससून रूग्णालयात भरती

High Court | हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय ! ‘दलित व्यक्तीने क्रॉस घातल्यास किंवा चर्चमध्ये गेल्यास जात प्रमाणपत्र…’