Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम देतीय 15 लाख रुपये कमावण्याची संधी ! जाणून घ्या किती गुंतवणुकीवर मिळू शकतो लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित मानले जाते. याच्या अनेक अशा योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणुक केल्यास चांगले रिटर्न मिळते. अशीच एक सिनियर सिटीझन स्कीम (Senior Citizen Scheme – SCSS) आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही 15 लाख रुपयांपर्यंत मिळवू शकता. या योजनेत किती वर्षापर्यंत किती गुंतवणूक करावी लागेल आणि किती व्याज मिळते ते जाणून घेवूयात. (Post Office Scheme)

 

किती मिळते व्याज

 

पोस्ट ऑफिसच्या सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीममध्ये वार्षिक 7.4% व्याज दिले जाते. यामध्ये किमान 1000 रुपयांपासून खाते उघडता येते आणि कमाल रक्कम 15 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल. (Post Office Scheme)

 

या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

 

  • योजनेत 60 वर्षापेक्षा जास्त वयाचा व्यक्ती गुंतवणूक करू शकतो.
  • 55 वर्षापेक्षा जास्त आणि 60 वर्षापेक्षा कमी वयाचा सेवानिवृत्त नागरिक कर्मचारी, अटी अंतर्गत सेवानिवृत्ती लाभ प्राप्त करू शकतो.
  • खाते व्यक्तीगत किंवा जॉईंट पती-पत्नीसोबत संयुक्त प्रकारे उघडता येऊ शकते.
  • या योजनेंतर्गत गुंतवणुक प्राप्तीकर कायदा, 1961 चे कलम 80 सी च्या लाभासाठी पात्र आहे.
  • पाच वर्षासाठी गुंतवणूक करता येते.
  • खातेधारकाचा मृत्यू झाल्यास मृत्युच्या तारखेपासून खात्यावर पीओ बचत खात्याच्या दराने व्याज मिळवेल.
  • खातेधारकाच्या मृत्यनंतर नॉमिनीला पूर्ण रक्कम दिली जाते.

 

कसा तयार होईल सुमारे 15 लाखांचा फंड?

 

जवळपास 15 लाखाचा फंड बनवण्यासाठी एकरकमी 10.50 लाख रुपयांची गुंतवणुक करावी लागेल. 10.50 लाखाची गुंतवणुक केल्यास तुम्हाला 7.4 टक्के दराने कापांऊंड व्याजचा लाभ मिळेल. म्हणजे जेव्हा तुमची ही गुंतवणुक 5 वर्षाची होईल तेव्हा जवळपास 14,95000 रुपयांचा फंड मिळेल.

 

कर सवलतीचा सुद्धा मिळेल लाभ

 

याशिवाय योजनेत कर सवलत सुद्धा मिळेल. जर तुमच्या व्याजाची रक्कम 10,000 रुपये वार्षिक होत असेल तर टीडीएस कापावा लागतो. मात्र, या योजनेत इन्व्हेस्टमेंटवर इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट सेक्शन 80सी अंतर्गत सूट मिळते.

 

Web Title : Post Office Scheme | this post office scheme is giving a chance to earn 15 lakh rupees know how much investment can be availed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी, कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

PMSMY | मोदी सरकारची खास योजना ! रोज 2 रुपये गुंतवा अन् वृद्धापकाळात मिळवा 36 हजारांची पेन्शन, जाणून घ्या

Ajit Pawar | अजितदादांनी भरसभेतच सुनावले पोलिस अधिकार्‍याला खडे ‘बोल’, म्हणाले – ‘चांगले DySP म्हणून तुम्हाला बारामतीत आणलं होतं…’