Post Vaccination Diet : कोरोना लसीचा प्रभाव आणखी वाढवू शकतात खाण्या-पिण्याच्या ‘या’ गोष्टी, रोगप्रतिकारक शक्ती बनते ‘पावरफुल’, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. पण या लसीचा प्रभाव आणखी वाढवता येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला विशेष पदार्थाची गरज आहे.

कोरोनाची लस घेतल्यानंतर डोकेदुखी, ताप येणे, अंगदुखी किंवा अशक्तपणा असे साईड इफेक्ट्स जाणवतात. पण हे कमी करण्यासाठी तुमच्या आहार आणि रुटीनवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

कांदा आणि लसूण –

कांदा आणि लसूण या दोन्हीमध्ये चांगला इम्युनिटी बूस्टर मानले जाते. लस घेतल्यानंतर आहारात याचा समावेश करावा. कच्च्या लसूणमध्ये मॅग्निज, व्हिटॅमिन B6, फायबर, सेलेनियम, व्हिटॅमिन C आणि कॅल्शियम, कॉपर, पोटॅशियम, आयर्न आणि फॉस्फोरस असते. यामध्ये अँटिऑक्सिडेंटचे प्रमाण सर्वाधिक असते. तसेच कांदामध्ये व्हिटॅमिन C सर्वाधिक असते.

फळे –

ज्या फळांमध्ये जास्त प्रमाणात पाणी असते ते लसींचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी मदत करतो. या फळांमध्ये ताजा आणि पुरेशा प्रमाणात खाणे गरजेचे आहे. टरबूज, खरबूज, चिक्कू, अननस, केळी आणि आंबा यांसारखी फळे फायदेशीर असतात. हे फळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

पालेभाज्या –

हिरव्या पालेभाज्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. हे आतड्यांसाठी फायदेशीर असतात. जर तुम्ही लस घेऊन आला असाल तर तुम्ही तुमच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. या पालेभाज्या कच्च्याही तुम्ही खाऊ शकतात.

हळद –

हळद ही नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ओळखली जाते. पचनक्रिया योग्य ठेवण्यासाठी आणि शरीरातील सूज कमी करण्यासाठी हळद ओळखली जाते. बहुतांश घरात हळदीचा वापर केला जातो. दिवसातून एकादा किंवा दोनदा हळद टाकून काढा पिऊ शकतात.

पाणी –

लस घेतल्यानंतर सर्वात गरजेची म्हणजे स्वत:ला हायड्रेट ठेवणे. त्यानंतर तुमचे शरीर ऍक्टिव्ह राहते आणि साईड इफेक्टही कमी वाटेल. लस घेण्याच्या एक दिवसापूर्वी आणि काही दिवसानंतर जास्त प्रमाणात पाणी प्यावे. पण पाणी थंड नसावे याची काळजी घ्यावी. पिण्याचे पाणी सामान्य तापमानातील असावे.

ब्राउन राईस, ओट्सचा करा समावेश

फायबर जास्त प्रमाणात असलेले धान्याचा आहारात समावेश करावा. ब्राउन राईस, साबुत अनाज, पॉपकॉर्न, बाजरी, ज्वारी, ओट्स यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

पुरेशी झोप

लस घेण्याच्या एक दिवस अगोदर चांगली झोप घ्यावी. चांगली झोप न घेतल्याने त्याचा प्रभाव तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. लस घेतल्यानंतर अनेकांना थकवा आणि सुस्त वाटते. त्यामुळे लस घेतल्यानंतर शरीराला आराम देण्याची गरज आहे.