सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! टपाल खात्यात 5000 जागांसाठी मेगाभरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय डाक विभागात म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये मोठी भरती होणार आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत ते यासाठी नोंदणी आणि शुल्क जमा करु शकतात. अर्ज प्रकिया सुरु झाली आहे. उमेदवार 14 डिसेंबर 2019 पर्यंत या पदांसाठी अर्ज करु शकतात.

महत्वाच्या तारखा
अर्ज आणि शुल्क जमा करण्याची प्रारंभाची तारीख – 5 डिसेंबर 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 14 डिसेंबर 2019

पदाचे नाव आणि संख्या
ग्रामीण डाक सेवक – 5,778

शैक्षणिक योग्यता
उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून 10 वी पास असणे आवश्यक आहे. योग्यतेबाबात इतर माहितीसाठी उमेदवारींनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

वयोमर्यादा
उमेदवारांचे किमान वय 18 ते जास्तीत जास्त 40 वर्षांपर्यंत असावे.

असा करा अर्ज
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी डाक विभागच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. सर्व माहिती घेऊन उमेदवारांनी अर्ज करावा, अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2019 आहे. आधिक माहितीसाठी उमेदवारांनी http://www.appost.in/gdsonline/Home.aspx या वेबसाइटला भेट द्यावी.

नोकरीचे स्थान – पश्चिम बंगाल

Visit : Policenama.com

 

You might also like