Video : नितेश राणे आणि कार्यकर्त्यांनी घातली उप अभियंत्याला चिखलाची ‘अंघोळ’

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात होत असलेल्या चिखल आणि खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या रोषाचा फटका महामार्ग उपअभियंत्याला बसला. स्वाभीमानी संघटेनच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आणि आमदार नितेश राणे यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना महामार्गावर चिखलाची आंघोळ घातली. महामार्गच्या दुरावस्थेस प्रकाश खेडेकर यांना जबाबदार धरून त्यांना चिखलाची आंघोळ घालण्यात आली. यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह स्वामीभानी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कणकवलीकरांना महामार्गावरील चिखल आणि खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास उपभियंत्यांनाही व्हावा यासाठी आमदार नितेश राणे यांनी त्यांना चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली. मागील काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य होऊन महामार्गाची दुरावस्था झाली आहे.

महामार्गाच्या कामावर झालेल्या कामाच्या चुकांमुळे पावसाचे पाणी कणकवली बाजारपेठेत शिरले होते. त्यामुळे नागरिकांचा रोष होता. हाच रोष आज पहायला मिळाला. नितेश राणे यांनी उपअभियंता शेडेकर यांना गडनदीवरील पुलापासून जाणवली येथील पुलापर्यंत चालत नेऊन रस्त्याची दुरावस्था दाखवून दिली. तसेच त्यांना गडनदीवरील पुलाला बांधून ठेवले.

महामार्गाच्या चौपदरी करणामुळे जिवीत अथावा वित्तहानी झाल्यास संबंधीतावर गुन्हे दाखल करणार असल्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे कणकवलीत पाणी शिरले. यामुळे ८३ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिलेला शब्द पाळावा. त्यांच्यामध्ये हिंम्मत असेल तर त्यांनी ठेकेदार कंपनीवर गुन्हे दाखल करून दाखववाते असा टोला नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्यावेळी लगावला होता.

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा