Prabhas Project K Look Out | प्रोजेक्ट- केमधील अभिनेता प्रभासचा पहिला लूक आऊट; सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन – Prabhas Project K Look Out | दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Actor Prabhas) हा आता ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटामधून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटानंतर अभिनेता प्रभास हा ‘प्रोजेक्ट के’ या बिग बजेट चित्रपटामध्ये दिसणार आहे. आज (दि.19) प्रोजेक्ट के मधील प्रभासचा पहिला लूक आऊट (Prabhas Project K Look Out) झाला आहे. या चित्रपटाचे खरे नाव अद्याप समोर यायचे बाकी आहे. मात्र आता प्रभासचा लूक आऊट करण्यात आला आहे.

‘प्रोजेक्ट के’ हा एक बहुचर्चित व बहुप्रतिक्षित बिग बजेट चित्रपट आहे. यामध्ये प्रभास महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. वैजयंती फिल्म तर्फे ट्वीट करत प्रभासचा ‘प्रोजेक्ट के’ (Project K) मधील पहिला लूक आऊट केला आहे. तसेच प्रभासने देखील त्याच्या सोशल मीडियावर तो पोस्ट केला आहे. यामध्ये अभिनेता प्रभास योद्ध्याप्रमाणे दिसत असून, पोस्टरमध्ये त्याचा लूक रणभूमीवरील योद्धा सारखा दिसत आहे. हा लूक आऊट करताना वैजयंती फिल्म्सने ट्वीट केले आहे की, “हीरो चा उदय होत आहे.. आता पासून गेम बदलणार आहे. हा #ProjectK मधील रिबेल स्टार प्रभास आहे.” या लूकमध्ये प्रभासचे केस वाढलेले दिसत आहे.

वैजयंती फिल्म्स तर्फे काल (दि.18) ‘प्रोजेक्ट के’ मध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा फर्स्ट लूक आऊट (Project K Deepika Look Out) करण्यात आला. दीपिकाचा लूक देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. हॉलीवुडमधील गिल्डशी (Hollywood Writers Strike) निगडित असल्याने दीपिकाने तो तिच्या ऑफिशियल अकाऊंटवर पोस्ट केला नाही. मात्र तरी सोशल मीडियावर तिच्या लूकची खूप चर्चा झाली. यानंतर आता अभिनेता प्रभासचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेता प्रभासचा ‘प्रोजेक्ट के’ मधील लूक काही लोकांना आवडला असून त्यांनी कमेंट मध्ये कौतुक केले आहे. मात्र काही नेटकऱ्यांना हा प्रभासचा लूक आवडला नसून त्यांनी प्रभासला ट्रोल (Actor Prabhas Troll) करण्यास सुरुवात केली आहे.

‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे खरे नाव (Project K Real Name)
देखील अद्याप सांगण्यात आलेले नाही. ‘प्रोजेक्ट के’ मध्ये अभिनेता प्रभास व दीपिका पादुकोण बरोबर अमिताभ बच्चन
(Amitabh Bachchan), कमल हासन (Kamal Haasan), दाक्षिणात्य अभिनेता सूर्या (Suriya) व दिशा पाटनी (Disha Patani)
हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. येत्या 20 तारखेला अमेरिकेमध्ये प्रोजेक्ट के चित्रपटाचा प्रिमियर शो
(Project K Premier Show) होणार आहे. यावेळी चित्रपटाचे खरे नाव, रिलीज डेट, टीझर व ट्रेलर या बद्दल माहिती देणार आहेत.
सध्या तरी अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता प्रभास यांचा चित्रपटातील पहिला लूक आऊट (Prabhas Project K Look Out)
करण्यात आला असून हे लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Web Title : Prabhas Project K Look Out | project k prabhas first look poster out see pic nag ashwin science fiction film first glimpse july 21

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | NIA कडून फरार घोषित केलेल्यांच्या मुसक्या आवळणार्‍या पोलिसांचा CP रितेश कुमार, Jt CP संदीप कर्णिक यांच्याकडून सन्मान (Video)

Pooja Hegde | अभिनेत्री पूजा हेगडेच्या डीप नेक बॉडीकॉन ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष

Terrorists Arrested in Pune | कोथरुड ‌भागातून अटक केलेल्या दहशतवाद्यांना पोलीस कोठडी

The Poona Merchants Chambers | राज्यभरातील व्यापारी पुण्यात एकवटणार; पुण्यात होणार राज्य व्यापार परिषद